शिवसेनेला मुख्यमंत्रीपद मिळेल असं वाटत नसल्याचे म्हणत रामदास आठवले यांनी मोठं विधान केलं आहे. शिवसेनेला मुख्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता नाही. भाजपाचा मुख्यमंत्री आणि शिवसेनेचा उपमुख्यमंत्री असं पहायला मिळू शकते, असंही आठवले म्हणाले आहेत. दोन दिवसांत उद्धव ठाकरे युती आणि सत्तास्थापनेचा निर्णय घेतील. गरज लागल्यास निरोप घेऊन मातोश्रीवर जाण्याची तयारी असल्याचेही रामदास आठवले सांगितले. महायुतीला जनतनेने निवडलं आहे, त्या जनमताचा आदर दोन्ही पक्षांनी करावा आणि शिवसेनेने उपमुख्यमंत्रीपद स्वीकारावे अशी अपेक्षा रामदास आठवलेंनी व्यक्त केली आहे. आपण याबाबत भाजपा आणि शिवसेना या दोन्ही पक्षांच्या नेत्यांशी चर्चा करणार आहोत असंही आठवलेंनी म्हटलं आहे. सत्तास्थापनेचं काय करायचं याचा निर्णय येत्या चार ते पाच दिवसात होईल असंही रामदास आठवले यांनी स्पष्ट केलं.