महाराष्ट्रात महाविकास आघाडीमध्ये चांगला समन्वय आहे, शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत यांची माहिती

0
136

 

सिंधुदुर्ग – राज्यात सरकार चालवत असताना महाविकास आघाडीत कुठल्याही प्रकारची नाराजी, किंवा कुरघोडीच राजकारण नाही. आघाडीमधे चांगला समन्वय असल्याची माहिती शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत यांनी दिलीय. ते कुडाळ येथे बोलत होते.

सेनेचे नगरसेवक राष्ट्रवादीत जाणे हा स्थानिक लेवलचा प्रश्न आहे त्यात वरिष्ठ नेत्यानी गांभीर्याने घेतलेलं नाही. ज्या ज्या वेळेला गरज असते तेव्हा एक पिता म्हणून शरद पवार साहेब मुख्यमंत्र्यांना मार्गदर्शन करत असतात त्यातून चागंली चर्चा होत असते अशी माहितीही त्यांनी कुडाळ येथील महीला आणि बाल रूग्णालयाची पाहणी दौ-यावेळी दीली. कुडाळ येथील महिला बाल रूग्णालय चार महिन्यात सुरू होईल असेही खासदार विनायक राऊत, यांनी यावेळी सांगितले. रूग्णालयाच्या विद्युतीकरणाचे काम दीड महिन्यात पूर्ण होईल तर उर्वरीत कामे देखील लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश बांधकाम अभियंत्यांना दिले असल्याचेही खासदार यांनी सांगितले. याप्रसंगी आमदार वैभव नाईक, जिल्हाप्रमुख संजय पडते, जिल्हा बँक अध्यक्ष सतिश सावंत, जि.प.सदस्य अमरसेन सावंत आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here