26 C
Panjim
Tuesday, January 31, 2023

भाजपच्या विजयात संघटनमंत्र्यांचा सिंहाचा वाटा

- Advertisement -spot_img

पणजी:विधानसभेच्या चार पैकी तीन आणि लोकसभेच्या दोन पैकी एका जागेवर भाजपला विजय मिळवून देत मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील भाजप आघाडी सरकारला भक्कम करण्यात संघटनमंत्री सतीश धोंड यांचा सिंहाचा वाटा आहे.गुरुवारी मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि इतर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत धोंड यांचाही सत्कार करण्यात आला.

माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे आजारपण बळावू लागल्या नंतर कोकण प्रांतामध्ये पक्षीय जबाबदारी सांभाळत असलेल्या सतीश धोंड यांच्याकडे पुन्हा गोव्याची धुरा सोपवण्यात आली.पर्रिकर यांच्या आजारपणाच्या काळात भाजपचे कार्यकर्ते बॅकफुटवर गेले होते.पर्रिकर यांच्या आजारपणामुळे सरकारवर परिणाम होऊ लागला होता.विरोधी पक्षाने तत्कालीन पर्रिकर सरकार विरोधात रान उठवून सरकार विरोधात वातावरण बनवले होते.लोकांच्या रोषाचा सामना भाजप कार्यकर्त्यांना देखील करावा लागत होता.
नेमक्या याच परिस्थितीत गोव्यात संघटन मंत्री म्हणून परतलेल्या धोंड यांनी कार्यकर्त्यांन मधला जोश परत आणला.आपले संघटन मजबूत करण्याचे कसब पणाला लावून त्यांनी पर्रिकर असतानाच लोकसभा निवडणूकांची मोर्चेबांधणी सुरु केली होती.बांबोळी येथील भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची सभा असो की श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियम मध्ये पार पडलेली पंतप्रधान नरेद्र मोदी यांच्या सभा यशस्वी करून दाखवण्याचे शिवधनुष्य धोंड यांनी कार्यकर्त्यांच्या मदतीने यशस्वीपणे पेलून दाखवले.
मनोहर पर्रिकर यांच्या निधना नंतर नवीन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली गोव्यात भाजपला सावरण्यात धोंड यांची महत्वाची भूमिका आहे.
मगोचे उपद्रव मूल्य वाढू लागल्या नंतर बाबू आजगावकर आणि दीपक पाऊसकर यांना भाजपमध्ये आणून सुदिन ढवळीकर यांचे पंख छाटण्याची हिम्मत धोंड यांच्या मार्गदर्शनामुळेच भाजप नेते करू शकले.
दयानंद सोपटे,सुभाष शिरोडकर,जोशुआ डिसोझा,सिद्धार्थ कुंकळ्येकर, श्रीपाद नाईक आणि नरेंद्र सावईकर यांना निवडून आणण्यासाठी भाजपची रणनीती आखण्यात धोंड यांची भूमिका महत्वपूर्ण अशीच होती.
कार्यकर्त्यांना सक्रिय करून त्यांना निवडणुकीच्या कामास लावण्यासाठी धोंड यांनी आपले संघटन कौशल्य पणास लावले.पणजी आणि दक्षिण गोव्याच्या जागा भाजपला गमवाव्या लागल्या तरी तेथे पुन्हा भाजपला विजयी करण्याचा चंग धोंड यांनी बांधला आहे.
गुरुवारी निवडणुकांचे निकाल लागल्या नंतर विजयी उमेदवार पणजी येथील मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जमले होते.त्याचवेळी या विजयात महत्वपूर्ण भूमिका बजावलेल्या सतीश धोंड यांच्या गळ्यात देखील माळ घालून त्यांच्या संघटन कौशल्याला दाद देण्यात आली.
मुख्यमंत्री प्रमोद सावंत,भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार विनय तेंडुलकर यांना सोबत करून भाजप आघाडी सरकार स्थिर ठेवणे आणि जेथे भाजप कमी पडला तेथे भाजपची ताकद वाढवण्याची जबाबदारी धोंड यशस्वीपणे पेलतील याची खात्री कार्यकर्ते आणि पदाधिकारी बाळगुन आहेत.

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

Latest On Our Channel

YouTube player

Latest On Hub Encounter

YouTube player

Latest on Passay

YouTube player

Latest on Unsung hero

YouTube player
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles