नियोजन सभागृह हे विकासासाठी, राजकारण आणल्यास पळता भुई थोडी होईल; केंद्रीय मंत्री राणेंचा इशारा

0
68

 

सिंधुदुर्ग – मला नियम माहीत आहे.माझा जो मुद्दा असेल तो जिल्ह्याच्या विकासाचाच असेल.पालकमंत्री उदय सामंत यांनी सरपंच ,जिल्हापरिषद सदस्य यांनी प्रवेश केल्यास २५ ते ५० लाख निधी देऊ असे आश्वासन दिले होते.

जिल्हा नियोजनाचा निधी पक्ष प्रवेशासाठी वापरता येतो काय ? असा थेट सवाल केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पालकमंत्री सामंत याना करताच सभागृहात एकच हलकल्लोळ झाला.

काही शिवसेना सदस्यांनी हा मुद्दा येथे घेता येणार नसल्याचे सांगताच मी जिल्हा नियोजन मधून रक्कमा वाटपाचा मुद्दा घेतला आहे तो याच सभागृहाचा आहे.

असा निधी वाटण्याचा अधिकार तुम्हाला नाही.हे सभागृहात राजकारण करण्यासाठी नाही तसे करणार असाल तर अनेक मुद्दे माझ्या कडे आहेत तुम्हाला दिवस पुरणार नाही आणि पळता भुई थोडी होईल असा इशारा यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी देताच सर्व गप्पा झाले.

पालकमंत्री उदय सामंत यांनी आपल्या वक्तव्याचा खुलासा केला आणि प्रसिद्ध बातमी चुकीची असल्याचे सांगून वेळ मारून नेली.

पालकमंत्री सरपंच आणि जिल्हापरिषद सदस्य विकत घेण्याठी पैसे वाटतात हे खरे आहे काय ? जिल्हा नियोजनचा अध्यक्ष म्हणून २५ किंवा ५० लाख रुपये दिवून कुठच्याही सदस्यला प्रलोभन जिल्हा नियोजन मधून देता येणार नाही.

असे केंद्रीय मंत्री राणे यांनी सांगितले.यावेळी झालेल्या चर्चेत राजकीय बोला मात्र तो तुम्ही खासगी पैसे वाटा,ब्यागा भरून भरून वाटा मात्र शासनाचा पैसा विकासालाच खर्च झाला पाहिजे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here