दुहेरी हत्त्याकांडातील संशयित कुशल टंगसाळी पुन्हा पोलीस कोठडीत

0
108

 

सिंधुदुर्ग – सावंतवाडी शहरात घडलेल्या दुहेरी हत्त्याकांडातील संशयित कुशल टंगसाळी याला सावंतवाडी पोलिसांनी पुन्हा पोलीस कोठडीत घेतले आहे. गेले तीन दिवस “तो” न्यायालयीन कोठडीत होता.

आज त्याला येथील न्यायालयात हजर केले असता त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. याबाबत सावंतवाडी पोलीस ठाण्याचे निरीक्षक शंकर कोरे यांना विचारले असता अधिकचा तपास करायचा असल्यामुळे आम्ही त्याला पुन्हा पोलिस कोठडीत घेतले, असे सांगून त्यांनी अधिक बोलण्यास नकार दिला.

यातील संशयित कुशल याला खून प्रकरणी ताब्यात घेण्यात आले होते. अटक केल्यानंतर पोलिसांनी सर्व काही तपास झालेला आहे.

त्यामुळे अधिकच्या पोलीस कोठडीची गरज नाही, असे सांगून त्याला एक दिवस पोलिस कोठडी द्यावी, अशी मागणी केली होती. त्यानंतर त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली होती.

परंतु आज त्याला पुन्हा ताब्यात घेण्यात आले आहे. याबाबत आरोपीचे वकील संकेत नेवगी यांनी आपली बाजू मांडली. यापूर्वी पोलिसांनी ९० टक्के तपास झाला आहे. आणि संशयितांविरुद्ध कोणताही ठोस पुरावा उपलब्ध होत नाही.

त्यामुळे संशयितांविरुद्ध पुरावे मिळत नसल्यामुळे पोलिसांनी अशा प्रकारे पुन्हा एकदा कोठडीची मागणी केली आहे.
त्यामुळे आता पुन्हा पोलिस कोठडीत घेण्याची गरज काय ?असा सवाल त्यांनी केला. यावेळी सरकारी पक्षातर्फे वेदिका राऊळ यांनी बाजू मांडली.

त्या म्हणाल्या हा गुन्हा गंभीर स्वरूपाचा आहे. काही तपास अजूनही बाकी आहे. कायद्याच्या तरतुदीनुसार संशयिताला पुन्हा एकदा न्यायाधीन कोठडी मधून पोलीस कोठडीत घेता येते. त्यामुळे त्याला पुन्हा पोलीस कोठडी देण्याची मागणी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here