जिल्हा बँकेची निवडणूक महाविकास आघाडीच्या माध्यमातूनच लढविली जाईल जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी दिली माहिती

0
62

सिंधुदुर्ग – जिल्हा बँकेची निवडणूक ही महाविकास आघाडीच्या माध्यमातूनच लढविली जाईल. याबाबत आमच्या नेत्यांची बैठक वरिष्ठ पातळीवर पार पडली आहे.

तर त्यासाठी उमेदवारांची चाचपणी सुद्धा सुरू आहे, अशी माहिती जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी दिली. दरम्यान गेल्या साडे सहा वर्षात आमच्या संचालक मंडळाने शेतकऱ्यांच्या हिताचीच कामे केली आहेत.

कर्ज देताना सुद्धा आम्ही कोणतेही राजकारण केले नाही, त्यामुळे आम्हाला वेगळ्या प्रचाराची गरज नाही, असा टोलाही त्यांनी यावेळी विरोधकांना लगावला.

रविवारी सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत सतीश सावंत बोलत होते.
यावेळी बँकेचे संचालक व्हीक्टर डॉन्टस, कणकवली नगरसेवक सुशांत नाईक आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here