चतुर्थीच्या रात्री कणकवलीत चोरट्यानी फोडली दुकाने

0
169

सिंधुदुर्ग – कणकवली शहरात गांगो मंदिर समोरील बँक ऑफ इंडियाच्या एटीएम लगतचे दोन दुकानगाळे शुक्रवारी रात्री उशिरा चोरट्यानी फोडले.

दुकानांचे शटर उचकटून चोरट्यानी दुकानात प्रवेश केला. यात एका वैद्यकीय साहित्य व एका कापड दुकानाचा समावेश आहे.

चोरटे दुकानाचे शटर तोडून चोरी करून बाहेर येत असतानाच कुणी तरी येत असल्याचा सुगावा लागताच चोरट्यानी जानवलीच्या दिशेने धूम ठोकली.

याच दरम्यान कणकवलीचे माजी नगरसेवक भूषण परुळेकर हे आपल्या घराकडे जात असतानाच त्यांना हे चोरटे पळताना दिसले.

सदर घटनेची माहिती परुळेकर यांनी तातडीने कणकवली पोलीस स्टेशनला दिली. त्यानंतर काही वेळातच पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते.

या घटनेत चोरीला किती मुद्देमाल गेला की चोरीचा प्रयत्न फसला याबाबत आज अद्याप काहीच समजू शकले नाही. गणेश चतुर्थी दिवशी सर्वजण या उत्सवात सहभागी होत असल्याची संधी साधत चोरटे सक्रिय झाले असून, या काळात अनेकजण आपले फ्लॅट बंद करून गावी जातात. त्यामुळे चोरटे सक्रिय होतात.

घटनेची माहिती मिळताच उपनगराध्यक्ष बंडू हर्णे हे देखील घटनास्थळी गेले होते. रात्री ही दोन दुकाने प्रथम दर्शनी निदर्शनास आली. पण अजून कुठे या चोरट्यानी डल्ला मारला का ते आज स्पष्ट होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here