26.6 C
Panjim
Tuesday, January 18, 2022

कोरोना अपडेट – सिंधुदुर्ग जिल्ह्यात 462 व्यक्ती क्वारंटाईन

Latest Hub Encounter

 

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आजमितीस एकूण 462 व्यक्ती क्वारंटाईन
असून त्यापैकी 320 व्यक्तींना घरीच क्वारंटाईन करण्यात आले आहे. तर 142 व्यक्ती या संस्थात्मक क्वारंटाईन मध्येआहेत.

जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत एकूण 478 नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असून 440 नमुन्यांचा तपासणी आहवाल प्राप्त झाला आहे. त्यापैकी 438 नमुन्यांचा अहवाल निगेटीव्ह आला आहे. तर अजून 38 नमुन्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झालेला नाही. जिल्हा सामान्य रुग्णालयातील विलगीकरण कक्षामध्ये सध्या 73 व्यक्ती दाखल असून त्यातील 57 व्यक्ती या डेडिकेटेड कोवीड हॉस्पिटलमध्ये तर 16 व्यक्ती या डेडिकेटेड कोवीड हेल्थ सेंटरमध्ये दाखल आहेत. आज रोजी आरोग्य विभागामार्फत एकूण 2632 व्यक्तींची तपासणी करण्यात आली आहे.

जिल्ह्यातील आजची स्थिती अशी आहे

1) घरीच क्वारंटाईन करण्यात आलेले 320
2) संस्थात्मक क्वारंटाईन मध्ये असलेले 142
3) पाठविण्यात आलेले एकूण नमुने 478
4) अहवाल प्राप्त झालेले नमुने 440
5) आतापर्यंत पॉजिटीव्ह आलेले नमुने 2
6) निगेटीव्ह आलेले नमुने 438
7) अहवाल प्राप्त न झालेले नमुने 38
8) विलगीकरण कक्षात दाखल रुग्ण 73
9) सध्यस्थितीत जिल्ह्यातील पॉजिटीव्ह रुग्ण 1
10) आज रोजी तपासणी करण्यात आलेल्या व्यक्ती 2632

त्या रुग्णाच्या संपर्कातील सर्व व्यक्तींचे नमुने निगेटिव्ह

जिल्ह्यात दिनांक 29 एप्रिल 2020 रोजी आणखी एक कोरोना बाधित रुग्ण सापडला आहे. या रुग्णाच्या संपर्कात एकूण 28 लोक आले होते. तर सावंतवाडी येथे गरोदर महिलेस सोडण्यासाठी आलेली व्यक्ती कोल्हापूर येथे कोरोना बाधीत असल्याचे निष्पन्न झाले आहे. जिल्ह्यातील 4 लोक या व्यक्तीच्या संपर्कात आले होते. असे एकूण 32 लोक कोरोना बाधीत रुग्णाच्या संपर्कात आल्याचे निष्पन्न झाले आहे. यातील 17 व्यक्ती या थेट नजीकच्या संपर्कातील आहेत. तर 15 व्यक्ती या कमी जोखमीच्या संपर्कातील आहेत. या सर्व 17 व्यक्तींचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यांचा अहवाल प्राप्त झाला असून या सर्वांचे आहवाल निगेटिव्ह आले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

- Advertisement -