सिंधुदुर्ग – केंद्रीय मंत्री नारायण राणे आज सकाळच्या सत्रात आपल्या खाजगी कामासाठी तहसीलदार कार्यालयात आले मात्र खुद्द केंद्रीय मंत्रीच आल्यामुळे प्रशासनाची थोडी धावपळ उडाली तहसीलदार कार्यालयातील पहिल्या मजल्यावर असलेल्या दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदणी करण्या साठी राणे तहसीलदार कार्यालयात आले होते. तहसीलदार आर जे पवार, दुय्यम निबंधक एम एम कुरुंदकर यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे स्वागत केले. यावेळी महसूल नायब तहसीलदार शिवाजी राठोड, तांत्रिक सहाय्यक बाजीराव काशीद यांच्यासह अन्य अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.