उपरकर त्या मायनिंग माफिया आणि अधिकाऱ्यांची नावे जाहीर करा, आम्ही तुमच्या पाठीशी राष्ट्रवादीचे उपजिल्हाध्यक्ष अनंत पिळणकर यांचे आव्हान

0
139

 

सिंधुदुर्ग – केवळ हवेत बार मारून उपरकर यांनी थांबू नये तर, त्यांनी कोणत्या मायनिंग व्यावसायिकाने कोणत्या अधिकाऱ्याला बायका पुरविल्या त्यांची नावे जाहीर करावीत. राष्ट्रवादी उपरकर यांच्या पाठीशी राहून हे अधिकारी आणि मायनिंग माफिया यांच्यावर कारवाई करण्यासाठी निश्चितच प्रमुख भूमिका घेईल. असे स्पष्ट मत राष्ट्रवादीचे उपजिल्हाध्यक्ष अनंत पिळणकर यांनी व्यक्त केले आहे.

कणकवली येथे बोलताना पिळणकर यांनी उपरकर यांना नावे जाहीर करण्याचे आव्हान दिले आहे. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हा चिटणीस रुपेश जाधव, कृषी सेलचे जिल्हाध्यक्ष समीर आचरेकर उपस्थित होते.

दोनच दिवसापूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांनी अवैध मायनिंग माफियांवर अधिकाऱ्यांना बायका पुरविण्याचा आरोप केला होता. सिलिका मायनिंग शेत्रात बेकायदा उत्खनन करणाऱ्या मायनिंग माफियांवर कारवाई होऊ नये, याकरता अधिकाऱ्यांना चक्क बायका पुरविल्या जातात असा गौप्यस्फोट करून उपरकर यांनी केलेले आरोप चांगलेच चर्चेत आहेत. मात्र या आरोपांना राष्ट्रवादीचे उपजिल्हाध्यक्ष अनंत पिळणकर यांनी आव्हान दिले आहे.

यावेळी बोलताना अनंत पिळणकर म्हणालेत, आपले काळे धंदे लपविण्यासाठी आणि त्याच्यावर पांघरूण घालण्यासाठी मायनिंग माफिया जर का अधिकाऱ्यांना बायका पुरवत असतील तर ही गंभीर बाब आहे. मात्र मायनिंग व्यवसायात अनेक लोक आहेत. त्यामुळे या लोकांपैकी बायका पुरविणारे कोण ? हे अद्यापही जनते समोर आलेले नाही. तसेच मायनिंग माफियांच्या या प्रलोभनांना बळी पडणारे अधिकारी कोण ? हे देखील जनतेसमोर येणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे या मायनिंग माफियांवर आणि अधिकाऱ्यांवर कडक कारवाई होणे देखील गरजेचे आहे. सर्वसामान्य लोकांना जगण्याचे अनेक प्रश्न पडले असताना सरकारच्या तिजोरीवर डल्ला मारणारे हे मायनिंग माफिया गजाआड झालेच पाहिजेत. पर्यावरणाचे मोठे नुकसान करताना या मायनिंग माफियांनी सरकारचा मोठा महसूल बुडविला आहे. त्यांच्यासोबत या व्यवसायात त्यांना पाठीशी घालणारे अधिकारीदेखील तेवढेच जबाबदार आहेत. त्यामुळे या दोन्ही बाजूच्या लोकांवर कारवाई होणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे परशुराम उपरकर यांनी मायनिंग माफिया आणि अधिकारी यांची नावे जाहीर करावीत. त्यांच्यावर कारवाई होण्यासाठी जे काही करावे लागेल ते करण्याकरता आम्ही परशुराम उपरकर यांच्या सोबत उभे राहू आणि शेवटपर्यंत लढू. असेही यावेळी अनंत पिळणकर म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here