आर.जी.मनोज परब यांची कार्यकर्त्यांसमवेत कोरगाव पंचायतीला भेट

0
116

 

पेडणे मतदारसंघातील कोरगाव पंचायत क्षेत्रात अनेक बेकायदा कामे सुरू असून सदर पंचायत मंडळ डोळेझाक करत असल्याचे समोर आल्यावर रेव्होलुशनरी गोवन्स चे प्रमुख मनोज परब व आर.जी. च्या कार्यकर्त्यांनी थेट कोरगाव पंचायतीला भेट दिली.

यादरम्यान पंचायत सरपंच यांची भेट झाली नसली तरी सचीवाशी वेगवेगळ्या मुद्यावर चर्चा करण्यात आली. यावेळी मनोज परब यांनी कोरगाव पांचायातलशेत्रातील सर्व्हे क्रमांक १०८ मध्ये मेगा हाउसिंग प्रकल्प उभारला जात असून ह्या प्रकल्पाला कायदेशीरपणे सहा मीटर रुंदीचा रस्ता नाही. तरीसुद्धा पंचायतीने त्या प्रकल्पाला परवानगी दिलेली असून तो परवाना त्वरित रद्ध करावा अशी मागणी मनोज परब यांनी सचिवांना केली आहे.

त्याचबरोबर कोरगाव पंचायत क्षेत्रात मोठमोठे प्लॉटस करून विकण्याचे काम जोरात चालू आहे. त्यानुसार बेकायदेशीरपणे रस्त्याचे काम चालू होते. आर.जी. च्या कार्यकर्त्यांनी या बेकायदेशीर रस्त्याचे काम बंद पाडले आहे. मार्च महिन्यात आर.जी. च्या कार्यकर्त्यांनी या बेकायदेशीर प्रकल्पाविरोधात पंचायतीत तक्रार केली होती. तरी त्याच्यावर आजपर्यंत तीच कार्यवाही केली नाही. स्थानिक लोकांचा ह्या प्रकल्पाला विरोध आहे कारण कोरगाव लोकांना आत्ताच पाणी मिळत नाही भविष्यात असे मेगा प्रकल्प उभे राहिले तर परिस्थिती आणखीन बिकट होईल. तरी पंचायत सचिवांनी जनतेच्या बाजूने मेगा प्रकल्पांना असल्याचा ठराव घ्यावा अशी विनंती मनोज परब यांनी भेटीदरम्यान साचीवाशी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here