सिंधुदुर्ग – अलायन्स एअरची विमानसेवा 9 ऑक्टोबर पासून सुरू होत असून सव्वातासाच्या प्रवासासाठी 2 हजार 621 रुपये आकारण्यात येणार आहेत.
बहुचर्चित सिंधुदुर्ग विमानतळाचे उदघाटन होत असून यासाठी एअर अलायन्स या विमान कंपनीने आपली विमानसेवा देऊ केली आहे.यासंदर्भात अलायन्स एअरने आज एक पत्रक जाहीर करून ही माहिती दिली.
ही विमानसेवा उडान योजनेअंतर्गत असून या एअरलाईन मार्फत 70 सीटर विमान मुंबई ते सिंधुदुर्ग प्रवासासाठी वापरण्यात येणारी आहे. हे विमान सकाळी सव्वा अकरा वाजता मुंबईहून निघेल व 1 वाजता सिंधुदुर्ग एअरपोर्टवर पोहोचेल.
हेच विमान 1 वाजून 25 मिनिटांनी सिंधुदुर्गवरून निघेल व मुंबई येथे अडीच वाजता पोहोचेल.याचे तिकीट मुंबई ते सिंधुदुर्गसाठी 2 हजार 520 रुपये तर सिंधुदुर्ग ते मुंबईसाठी 2 हजार 621 रुपये असेल.