रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात कलंबणी येथील शासकीय रुग्णालयात दाखल असलेल्या कोरोना रुग्णाचा आज मृत्यू झाला. ️ 6 एप्रिलला हा रुग्ण रुग्णालयात दाखल झाला होता. हा रुग्ण दुबईहून भारतात, खेड येथे आला होता. याबाबत जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी माहिती दिली आहे.



