सिंधुदुर्ग-आमदार नितेश राणे यांचे एक ट्विट सध्या चर्चेचा विषय बनले आहे. भारतीय नोटांवर छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो असावा, अशी मागणी भाजपा आमदार नितेश राणे यांनी ट्विटरद्वारे केली आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिवाळी सणात भारतीय नोटांवर गणपती किंवा लक्ष्मी यांचे फोटो असावेत, अशी मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर नोटांवरचे फोटो चर्चेचा विषय बनला आहे. या चर्चेत श्री. राणे यांनी उडी घेतली असून नोटांवर छत्रपती शिवाजी महाराजांची छबी असावी, असे त्यांनी म्हटले आहे.
त्यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवर छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा असलेली २०० रुपयांची न शेअर करत “ये परफेक्ट है” असे म्हटले आहे.