सिंधुदुर्ग – तिसऱ्या लाटेचं सोडा, पण गर्दी कराल तर दुसरीच लाट पुन्हा उलटेल, असा इशारा देणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर भाजपचे प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे यांनी टीका केलीय.
मालाडमधील कोविड रुग्णालयाच्या ऑनलाईन लोकार्पण सोहळ्यात बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला होता. कोरोनाची दुसरी नाट पूर्णपणे ओसरलेली नाही. तिसरी लाट कधी येईल, सांगता येत नाही. पण नागरिकांची गर्दी होत राहिली तर दुसरीच लाट पुन्हा उलटेल, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटलं होतं. या पार्श्वभूमीवर निलेश राणे यांनी द्विटरवर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ‘आता वाटायला लागलंय मुख्यमंत्र्यानाच तिसरी लाट हवी आहे. मंत्रिमंडळातले मंत्री कार्यालयाच्या उद्घाटनाला गर्दी करतात. स्वतः मुख्यमंत्री मेट्रोला झेंडा दाखवताना तुडुंब गर्दी झाली. मुख्यमंत्री फक्त सामान्य जनतेला धडे देतात. पण जिथे मंत्र्यांची वेळ येते, तेव्हा मुख्यमंत्र्याची चालत नाही, असे निलेश राणे यांनी म्हटले आहे.