सिंधुदुर्ग – पुजा चव्हाण प्रकरणावर माजी गृहराज्यमंत्री आणि शिवसेना आमदार दिपक केसरकर यांनी प्रतिक्रिया देताना विरोधी पक्षाने या प्रकरणात राजकारण करू नये. कारण प्रश्न एका महीलेला न्याय देण्याचा आहे. असे ते म्हणाले आहेत. तर राठोड यांच्यावर यापूर्वी असे आरोप झालेले नाहीत असे म्हणत त्यांची पाठराखण केली आहे. तर राणे विरुद्ध राऊत वादावर बोलताना एखाद्या व्यक्तीला रस्त्यात बदडवू म्हटल्या नंतर पोलिसांनी त्याची दखल का नाही घेतली त्यांच्यावर केस का नाही दाखल केली असा प्रश्न उपस्थित त्यांनी उपस्थित केला आहे.
राठोड यांची केली पाठराखण
पूजा चव्हाण प्रकरणी बोलताना ते म्हणाले, मुख्यमंत्री स्वतः या प्रकरणात संवेदनशील आहेत त्यांनी याप्रकरणाची माहीती मागवली आहे त्यांना थोडावेळ द्यायला हवा
या प्रकरणात नेमकी काय माहीती पुढे येतेय हे बगाव लागेल केवळ आरोपा वरून कोणावर कारवाई करणं हे घाईच आणि चुकीचं ठरेल.
या प्रकरणात काही तथ्य आढळल्यास मुख्यमंत्री स्वतः त्यावर निर्णय घेतील कारण हे प्रकरण एका कॅबिनेट मंत्र्या संदर्भातलं आहे. पुर्वी त्यांच्यावर अशा प्रकारचे आरोप झालेले नाहीत अशा शब्दात राठोड यांची पाठराखण केली आहे. जर तशा प्रकारचे पुरावे समोर आल्यास मुख्यमंत्री निर्णय घेतील अशी प्रतिक्रिया या प्रकरणात दिपक केसरकर यांनी दिली आहे.
राणे राऊत वादात पोलिसांच्या भूमिकेवर केले प्रश्नचिन्ह उपस्थित
राऊत विरुद्ध राणे प्रकरणावर बोलताना त्यांनी पोलिसांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल आहे. एखाद्या व्यक्तीला रस्त्यात बदडवू म्हटल्या नंतर पोलिसांनी त्याची दखल का नाही घेतली. त्यांच्यावर केस का नाही दाखल केली. असा प्रश्न उपस्थित केला आहे. सरळ सरळ जर कोणी रस्यात बदडवू म्हणत असेल तर तो अफेंन्स होतो याची दखल घेऊन पोलीसांनी जर तेव्हाचं त्यांना अटक केली असती तर पुढचा प्रसंग आला नसता. अनिष्ठ प्रवृत्तीना रस्त्यावर येऊन उत्तर द्यायचं नसतं तर कायद्याचा बडगा दाखवून त्यांना त्यांची जागा दाखवली पाहीजे. गेल्या पाच वर्षात त्यांना त्यांची जागा दाखवली म्हणून ही अनिष्ट शक्ती मानं खाली घालून होत्या मात्र पुन्हा ह्या शक्ती आपलं डोकं वर काढतायत त्यांच्यावर कायदेशीर ईलाज झाला पाहिजे. असे ते म्हणाले.