सिंधुदुर्ग – महाराष्ट्र गोवा राज्याचा संयुक्त प्रकल्प असलेल्या तिलारी धरणाच्या उजव्या कालव्यात परमे येथील डोंगरात खोदलेल्या बोगद्याच्या तोंडावर डोंगराचा काही भाग दरडीसह पुन्हा कोसळून कालव्यात पडला त्यामुळे येथून पेडणे गोवा येथे होणारा पाणी पुरवठा पुन्हा बंद झाला आहे. काही महिन्यांपूर्वी येथील दरड बाजूला केली होती पण तीन दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे पुन्हा डोंगर खचला आहे.
तिलारी धरणाचा उजवा कालवा हा परमे – कुडासा – पणतूर्ली ते सासोली – हणखणे – गोवा असा पेडणे गोवा तालुक्यात गेला आहे. गेल्या वर्षी या कालव्यात सासोली भटवाडी कुडासा भरपाल घोटगे परमे येथे डोंगर खचून कालव्यात आले त्यामुळे गोवा येथे होणारा पाणी पुरवठा बंद होता. या कालव्यावर गोव्यातील मोठा भाग अवलंबून आहे. शेती, बागायती बरोबरच येथील विविध प्रकल्पांसाठी य कालव्याचे पाणी वापरले जाते. तिलारी हा महराष्ट्र आणि गोवा राज्याची भागीदारी असलेला पाटबंधारे प्रकल्प आहे. गोवा राज्याचा मोठा भाग या प्रकल्पाच्या पाण्यावर अवलंबून आहे.