सिंधुदुर्ग – कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी जिल्ह्यातील सर्व राजकीय पक्षांच्या लोकप्रतिनिधींची बैठक आयोजित केली होती. हि बैठक ओरोस येथे सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या सभागृहात घेण्यात आली या बैठकीत कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हयात केल्या जाणाऱ्या उपाययोजनांबाबत उदय सामंत यांनी माहिती दिली. त्याचबरोबर सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींच्या कोरोनाच्या उपाययोजने संदर्भातील सूचना जाणून घेण्यात आल्या. त्यावर कार्यवाही करण्याचे आश्वासन सामंत यांनी दिले .
मुंबई,ठाणे पुणे कोल्हापूर व इतर जिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांना कॉरंटाईन करण्यासाठी जिल्ह्यातील शाळांचा वापर करण्यात येणार आहे. त्याचा आढावा घेत समस्या जाणून घेण्यात आल्या. जिल्ह्यातील हॉटेलस , वसतिगृह, खाजगी शाळा कॉरंटाईन कक्षासाठी वापरण्याबाबत चर्चा करण्यात आली.
एकंदर कोरोनाची हि लढाई सर्वानी एकजुटीने लढणे आवश्यक आहे. जिल्हा कोरोनामुक्त करण्यासाठी प्रशासन सर्व शर्तीनीशी प्रयत्न करत आहे. या लढाईत पालकमंत्री उदय सामंत यांनी जिल्ह्यातील सर्व पक्षांना सामावून घेत संकट काळात जिल्हयातील लोकप्रतिनिधींचे एकजुटीचे दर्शन घडवून आणले आहे.
यावेळी कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक,भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली, जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, संजय पडते ,भाजपनेते अतुल काळसेकर, काँग्रेस जिल्हाध्यक्ष बाळा गावडे, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित सामंत, मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब, आरपीआय जिल्हाध्यक्ष रतन कदम, शिवसेना नेते अतुल रावराणे, जि. प. गटनेते नागेंद्र परब, राजन दाभोळकर, जान्हवी सावंत, साक्षी वंजारे, इर्शाद शेख, बाबा आंगणे, दादा परब, त्याचबरोबर जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी, जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षित कुमार गेडाम, मुख्यकार्यकारी अधिकारी हेमंत वसेकर,जिल्हा शल्य चिकीत्सक धनंजय चाकूरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. खलीपे आदी अधिकारी तसेच सर्व पक्षीय पदाधिकारी,व जिल्हा बँक संचालक उपस्थित होते.



