एसटी कर्मचाऱ्याणा 50 लाखाचे विमा कवच मंजूर

0
161

 

सिंधुदुर्ग – कोरोना महामारीच्या कालावधीत जीवावर उदार होऊन काम करत असलेल्या एसटी कर्मचाऱयांना 50 लाखाचे विमा कवच मंजूर करण्यात आले आहे. परिवहनमंत्री अनिल परब यांनी ही मंजुरी दिली आहे. दरम्यान, आपल्या संघटनेने पाठपुरावा केल्यानेच हे विमा कवच मंजूर झाल्याचा दावा एसटी कामगार संघटना व महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस (इंटक) ने केला आहे.

याबाबत कामगार संघटनेचे मुंबई प्रदेश सचिव दिलीप साटम यांनी म्हटले आहे की, एसटी कामगारांना हे विमा कवच मिळावे, यासाठी आपल्या संघटनेकडून मुख्यमंत्री, परिवहनमंत्री, परिवहन राज्यमंत्री तसेच एसटीच्या व्यवस्थापकीय संचलाकांजवळ पत्रव्यवहार करण्यात आला होता. 1 जून रोजी परिवहनमंत्र्यांनी झूम ऍपच्या माध्यमातून संघटना प्रतिनिधींसोबत व्हीडिओ कॉन्फरन्सी घेतली. यावेळी हे विमा कवच जाहीर करण्यात आले आहे. याबद्दल संघटनेच्यावतीने परिवहनमंत्र्यांना धन्यवाद देण्यात येत असल्याचे म्हटले आहे.

इंटकचे विभागीय अध्यक्ष अशोक राणे यांनी म्हटले आहे, आपल्या संघटनेचे अध्यक्ष, माजी आमदार जयप्रकाश छाजेड यांनी या विमा कवचासाठी सातत्याने पत्रव्यवहार व पाठपुरावा केला होता. त्यानुसार परिवहनमंत्र्यांनी 1 जून रोजी या 50 लाख विमा कवचाची घोषणा केली आहे. ही योजना 30 सप्टेंबर 2020 पर्यंत लागू असणार आहे. इंटक संघटनेकडून सातत्याने केलेल्या पाठपुराव्याचे हे यश असून याबद्दल परिवहनमंत्र्यांचे आभार मानण्यात येत असल्याचे राणे यांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here