26.8 C
Panjim
Wednesday, June 29, 2022

सिंधुदुर्ग जिल्ह्यात साडेसहा लाखांची दारू जप्त, राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई संशयितांनी केले पलायन

spot_img
spot_img
spot_img
spot_img

 

सिंधुदुर्ग – गोवा बनावटीच्या दारूची बेकायदा वाहतूक करणाऱ्या दोन कारवर राज्य उत्पादन शुल्कच्या विशेष कृती पथकाने आरोस येथे कारवाई केली. कारवाईत सहा लाख 67 हजार 280 रुपये किमतीची दारू व सहा लाख रुपये किमतीच्या दोन मोटारी असा एकूण 12 लाख 67 हजार 280 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त घेतला. ही कारवाई रविवारी मध्यरात्री अडीचच्या सुमारास सापळा रचून करण्यात आली. दरम्यान, अंधाराचा फायदा घेत संशयितांनी पलायन केले. गेल्या दोन महिन्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाची ही सर्वात मोठी कारवाई आहे.

कार टाकून संशयितांचे पलायन

दारूची बेकायदा होत असलेली वाहतूक रोखण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने रत्नागिरी, सिंधुदुर्गसाठी पथक नेमले आहे. सातार्डामार्गे गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक होणार असे खात्रीलायक वृत्त पथकाच्या हाती लागले होते. त्यानुसार पथकप्रमुख निरीक्षक व्ही. व्ही. रोकडे यांनी कारवाईसाठी सापळा रचला. रात्री सातार्डा-मळेवाड मार्गावर गस्त ठेवण्यात आली. दरम्यान, मध्यरात्री अडीचच्या सुमारास दोन कार मळेवाडच्या दिशेने जात असताना त्यांना बॅटरीच्या साहाय्याने थांबण्याचा इशारा दिला; मात्र त्या दोन्ही चालकांनी वाहन न थांबवताच गाडी वळवून आरोसच्या दिशेने धूम ठोकली. पथकाने पाठलाग केला असता अरुंद पुलावर दारू वाहतूक करणाऱ्या दोन्ही गाड्यांचा ताबा सुटल्याने त्या चरात आढळून आल्या. पाहणी केली असता दोन्ही वाहनांच्या दर्शनी व मागील बाजूचे नुकसान झाले होते.

दोन्ही गाड्यांमध्ये गोवा बनावटीच्या दारूचे बेकायदा खोके

पथकप्रमुखांनी तपासणी केली असता त्या दोन्ही गाड्यांमध्ये गोवा बनावटीच्या दारूचे बेकायदा खोके असल्याचे समोर आले. संशयितांनी अंधाराचा फायदा घेत पलायन केल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सांगण्यात आले. ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पथकप्रमुख रोकडे, प्रवीण माने, दुय्यय निरीक्षक विश्‍वजीत आभाळे, शिवाजी काळे, अविनाश पाटील, जवान ज्योतिबा पाटील, केतन वझे, अर्जुन कापडे, शाहरुख तडवी, सचिन पैठणकर, सुशील परब, शरद साळुंखे, चालक साजीद मुल्ला, वसंत घुंगरे, संदीप कदम यांनी केली.

elthor-showroom-ad
triumph-high school-ad

Latest On Hub Encounter

YouTube player

Latest on Passay

YouTube player
- Advertisement -spot_img
spot_img
spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
YouTube player

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

More Articles

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img