26 C
Panjim
Friday, January 28, 2022

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेत नितेश राणे समर्थक मनीष दळवी अध्यक्ष… उपाध्यक्षपदी अतुल काळसेकरांना संधी; महाविकास आघाडीला पुन्हा एकदा “दणका”…

Latest Hub Encounter

 

सिंधुदुर्ग – जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाची माळ अखेर आमदार नितेश राणे यांचे समर्थक असलेल्या मनीष दळवी यांच्या गळ्यात पडली आहे. तर उपाध्यक्षपदी अतुल काळसेकर यांना संधी मिळाली आहे.

विरोधकांकडून आयत्यावेळी अर्ज दाखल करण्यात आले, मात्र त्या ठीकाणी झालेल्या मतदान प्रक्रियेत अकरा विरुद्ध सात मतांनी या दोघांना विजय मिळाला आहे. त्यांच्या विजयानंतर त्या ठिकाणी जमलेल्या भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. दरम्यान पुन्हा एकदा जिल्हा बँक राणे यांच्या ताब्यात राहिल्यामुळे त्याचा फायदा आता आगामी काळात होणाऱ्या निवडणूकांत होणार आहे.

आज झलेल्या जिल्हा बँक अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीआधीच महाविकास आघाडीच्या महिला संचालक नीता राणे या अनुपस्थित राहिल्याने हा महाविकास आघाडीला धक्का मानला जात आहे. भाजपाकडून अध्यक्ष पदासाठी मनीष दळवी तर उपाध्यक्ष पदासाठी अतुल काळसेकर यांनी उमेदवारी दाखल करण्यात आली.

तर महाविकास आघाडीकडून अध्यक्षपदासाठी व्हिक्टर डांटस तर उपाध्यक्ष पदासाठी सुशांत नाईक यांनी उमेदवारी दाखल करण्यात आली होती. आजच्या महत्वपूर्ण निवडीसाठी भाजपाचे सर्व 11 संचालक उपस्थित राहिलेत. मात्र महाविकास आघाडीच्या नीता राणेंची अनुपस्थिती ही महाविकास आघाडीला धक्का मानली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

- Advertisement -