23 C
Panjim
Friday, January 28, 2022

सिंधुदुर्गात प्रसिद्ध कुणकेश्वर यात्रा रद्द पालकमंत्री उदय सामंत यांची माहिती

Latest Hub Encounter

सिंधुदुर्ग – कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत असताना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध कुणकेश्वर देवस्थानची यात्रा रद्द करण्यात आली आहे. पालकमंत्री उदय सामंत यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.

11 ते 13 मार्च दरम्यान होणारी यात्रा रद्द

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातल्या प्रसिद्ध कुणकेश्वर देवस्थानची 11 ते 13 मार्च दरम्यान होणारी यात्रा कोरोनाच्या पार्श्वभुमीवर रद्द करण्यात आली असल्याची माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात कुणकेश्वर देवस्थानच्या आगामी यात्रा नियोजनाबाबत मंदिराच्या विश्वस्तांसमवेत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी आमदार वैभव नाईक, जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी, पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, जि.प. अध्यक्षा समिधा नाईक उपस्थित होते.

50 भाविकांच्या उपस्थितीत देवस्थानचे धार्मिक विधी पार पाडता येतील

पालकमंत्री पुढे म्हणाले की, कोरोनाच्या पार्श्वभुमीवर ही यात्रा जरी रद्द झाली असली तरी यात्रेदरम्यान मंदिर समिती विश्वस्तांसह केवळ 50 भाविकांच्या उपस्थितीत देवस्थानचे नित्योपचार तसेच इतर धार्मिक विधी पार पाडता येतील मात्र, हे विधी पार पाडत असताना त्यामध्ये किमान अर्ध्या तासाचे अंतर ठेवावे. त्याचबरोबर मंदिरात कोविड संदर्भातील सर्व निकषांचे पालन करण्यात यावे. आरोग्य विभागाने याठिकाणी पथक नेमावे. त्याचबरोबर यात्रेदरम्यान पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवावा. मंदिरात भाविकांनी एकत्रित गर्दी करु नये, असे सांगून कुणकेश्वर ग्रामस्थांनी यात्रा निर्विघ्नरित्या पार पाडण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही केले.

आराखडा 170 कोटी रुपयांवर पोचला

जिल्हा नियोजन चा 143 कोटी रुपयांचा आराखडा 170 कोटी रुपयांवर पोचला आहे. अशी माहिती यावेळी पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. 78 कोटी रुपये आपल्याला रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी मिळालेल्या आहेत असेही ते यावेळी म्हणाले. सिंधुरत्न योजनेसाठी अर्थमंत्र्यांनी पैसे देण्याचा निर्णय घेतला आहे. माजी पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आखलेली चांदा ते बांदा या योजने मधील प्रलंबित कामे सिंधुरत्न योजनेमध्ये घेण्यात यावीत असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले असल्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी यावेळी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

- Advertisement -