सिंधुदुर्गात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला तोंड देण्याकरता मुलांसाठी पन्नास खाटांचे कोविड हॉस्पिटल उभारणार पालकमंत्री उदय सामंत यांची माहीती ; प्लाझ्मा थेरेपी मशीनसाठी २५ लाखाची तरतूद

0
129

 

सिंधुदुर्ग – कोरोनाची येणारी तिसरी लाट लहान मुलांसाठी घातक आहे. त्यामुळे पुढील धोका लक्षात घेता,सिंधुदुर्ग जिल्ह्यात पन्नास खाटांचे कोविड हॉस्पिटल उभारणार. त्या ठिकाणी दाखल होणाऱ्या मुलांना अत्यंत चांगल्या पद्धतीने घरच्या सारखी ट्रिटमेंट दिली जाईल,असा विश्वास पालकमंत्री उदय सामंत यांनी आज येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केला. दरम्यान प्लाझ्मा थेरेपीचे मशीन जिल्ह्यासाठी देण्यात यावे, अशी मागणी होत आहे. या पार्श्वभूमीवर २५ लाख रुपयांची तरतूद या मशीनसाठी करण्यात आलेली आहे. आता या थेरेपी बाबत मतमतांतरे असली तरी त्याचा फायदा भविष्यात नक्कीच जिल्ह्यातील रुग्णांना होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

.जिल्ह्यातील जनतेने लाॅकडाऊनला प्रतिसाद दिला

यावेळी पालकमंत्री उदय सामंत म्हणाले, जिल्ह्यातील जनतेने लाॅकडाऊनला प्रतिसाद दिला. त्यामुळे जिल्हावासियांचा आपण आभारी आहे. त्याचा फायदा जिल्ह्यातील रुग्ण कमी होण्यास होत आहे.त्यामुळे निश्चितच वाढलेली संख्या भविष्यात कमी होईल,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.जिल्हा प्रशासनाच्या वतीने “माझे सिंधुदुर्ग माझी जबाबदारी”, अशी मोहीम राबवण्यात आली होती. या मोहिमेअंतर्गत २ लाख ९० हजार १२ लोकांपर्यंत जाऊन त्यांची तपासणी करण्यात आली. त्यात ५६ हजार लोक कोरोना पॉझिटिव्ह अजून आले आहेत. त्यामुळे त्याचा फायदा झालेला आहे. ही मोहीम आतापर्यंत ४० टक्के पूर्ण झाली असून, ६० टक्के लोकांपर्यंत पोहोचण्याचे काम सुरू आहे,असे त्यांनी सांगितले. लवकरच याबाबत कार्यवाही करण्यात येणार आहेत.त्या दृष्टीने संबंधित प्रशासनाला सूचना देण्यात आलेल्या आहेत. असेही ते म्हणाले.

मृत्यूदर कमी करण्यासाठी आमचे प्रयत्न

जिल्ह्यात लसीचा तुटवडा आहे. लस जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोचविण्याचा आमचा प्रयत्न आहे. असे अंगतानाचा पालकमंत्री उदय सामंत म्हणाले. सिंधुदुर्गचा मृत्यूदर कमी करण्यासाठी आमचे जिल्हा प्रशासन म्हणून प्रयत्न आहेत, असे त्यांनी सांगितले. येत्या काळात शिक्षकांना व फ्रन्टलाइनवर काम करणाऱ्या लोकांना लवकरच लसीकरण करण्यासंदर्भात प्रशासनाला सूचना दिलेल्या आहेत. लॉकडाऊन वाढणार का?,याबाबत विचारले असता त्यांनी अद्याप पर्यंत आपण त्यावर काही भाष्य करू शकत नाही, असे सांगून अधिक बोलणे टाळले.

प्लाझ्मा मशीन घेण्यासाठी २५ लाख रुपये निधी मंजूर

सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी लागणारे प्लाझ्मा मशीन घेण्यासाठी आज झालेल्या बैठकीत २५ लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला असून, लवकरच ही मशीन घेण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी यावेळी दिली. आता या थेरेपी बाबत मतमतांतरे असली तरी त्याचा फायदा भविष्यात नक्कीच जिल्ह्यातील रुग्णांना होईल,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here