शिरदोन पाले रस्त्याच्या डांबरीकरण कामास प्रारंभ आमदार विरेश बोरकर यांच्या हस्ते कामाचा शुभारंभ

0
212

.

सांत आंद्रे मतदारसंघातल्या शिरदोन पाले पंचायत क्षेत्रातील अंतर्गत रस्त्त्यांचे डांबरीकरण कामाचे लोकार्पण आमदार विरेश बोरकर यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी स्थानिक पंच सदस्य भारत शिरोडकर, जोयलन अफॉन्सो आणि नुतन शिरोडकर हजर होते.

शिरदोन इथल्या अंतर्गत रस्त्याचे हॉटमिक्स डांबरीकरण करण्याच्या कामासाठी सुमारे 90 लाख रुपये खर्च येणार असून, बऱ्याच वर्षापासून प्रलंबित असलेल्या या रस्त्याच्या कामाला चालना मिळाली आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या रस्ता विभागाचे तांत्रिक विभाग अधिकारी आणि पंचायत यांच्या सहकार्याने हे काम पूर्ण होत आहे. त्याचप्रमाणे इतर पंचायत क्षेत्रांतील प्रलंबित असलेली रस्त्यांची कामेही लवकरच मार्गी लागतील, त्याचबरोबर मतदारसंघाच्या विकासासाठी ग्रामीण भागात पक्के रस्ते होणे गरजेचे आहे यासाठी ग्रामीण भागाच्या विकासासाठी दर्जेदार रस्ते निर्मितीवर विशेष लक्ष केंद्रित केले असून या कामांसाठी निधीची कमतरता भासू देणार नाही असे प्रतिपादन विरेश बोरकर यांनी दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here