विनायक राऊत हे आमचे ऑफिस बॉय कधी झाले भडकलेल्या नितेश राणेंनी केला प्रश्न

0
148

 

सिंधुदुर्ग- भाजपा आमदार नितेश राणे हे खासदार विनायक राऊत यांच्या टीकेनंतर चांगलेच आक्रमक झाले आहेत. राऊत यांचा एकेरी उल्लेख करत त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे काय संबंध आहेत हे त्यांना काय माहीत असे त्यांनी यावेळी म्हटले आहे. विनायक राऊत हे खासदार आहेत कि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे ऑफिस बॉय असा प्रश्न करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना भेटायचा प्रयत्न करणाऱ्या विनायक राऊत यांनी आपले आणि पक्षाध्यक्षांचे संबंध चांगले राहतात काय याकडे लक्ष द्यावा असा सल्ला दिला आहे.

काय म्हणाले खासदार विनायक राऊत

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या खासगी सचिवाने अनेकांना गंडा घातल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी राणेंच्या पीएला दम दिला होता, असा दावा ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी केला. ते मंगळवारी कणकवली येथे आयोजित एका कार्यक्रमात बोलत होते. याप्रसंगी ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक, जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांच्यासह शिवसेनेचे नेते उपस्थित होते. यावेळी विनायक राऊत यांनी नारायण राणे यांच्यावर सडकून टीका केली. विनायक राऊत यांनी म्हटले की, नारायण राणे यांच्या सचिवाने अनेकांना गंडा घातला. ही बाब पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कानावर गेल्यानंतर त्यांनी राणे यांना दम भरला. आधी या सचिवाला काढून टाका अन्यथा तुमचे खाते काढून घेतले जाईल, असा थेट दम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राणेंना दिल्याचा दावा विनायक राऊत यांनी केला.

काय म्हणाले आमदार नितेश राणे

आतापर्यंत आम्हाला माहित होत कि विनायक राऊत हे रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे खासदार आहेत, आंजाला माहित नव्हतं कि ते केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या ऑफिस मध्ये चहा पण पाजायला असतात.’म्हणजे तो खासदार आहे कि ऑफिस बॉय आहे आमचा ? त्याला काय माहित भाजप मध्ये काय चाललंय ? त्याला काय माहित राणे साहेब आणि मोदी साहेब यांच्यामध्ये काय संबंध आहेत.असा एकेरी उल्लेख करत प्रश्न विचारून त्यांनी आपल्या पक्ष प्रमुखांबरोबर आपले पहिले संबंध संभाळावेत. कारण विनायक राऊत हे एकनाथ शिंदेंना भेटायला कसा प्रयत्न करताहेत हे जर मी कधी बोललो तर त्यांचे उरले सुरले पण कपडे राहणार नाहीत. म्हणून उगाच त्यांनी मोदी साहेब, नारायण राणे हि मोठी मोठी नवे त्यांनी घेऊ नयेत असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.

बाईट

नितेश राणे, भाजपा आमदार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here