रेल्वे विद्युतीकरण कामाची तार चोरल्याप्रकरणी तीनही आरोपींना ८ जुलैपर्यंत पोलिस कोठडी

0
62

सिंधुदुर्ग – कुडाळ रेल्वे स्थानक येथे सुरू असलेल्या कोकण रेल्वेच्या विद्युतीकरण कामासाठी वापरली जाणारी तांब्याची तार चोरीप्रकरणी तीन आरोपींना आज न्यायालयात हजर केले असता पुन्हा ८ जुलै पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

कुडाळ पोलिसांनी अजून एक आयशर टेम्पो आणि विद्युत तार आरोपींकडून मिळवायची असल्यामुळे पोलीस कोठडीची मागणी केली होती या मागणीनुसार प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी ही पोलिस कोठडी सुनावली आहे.

कुडाळ रेल्वे स्थानक येथे एल अँड टी कंपनीचे रेल्वे गोदामात विद्युतीकरण कामाचे साहित्य ठेवण्यात आले आहे. या साहित्यामधील तांब्याची तार या गोदामाचे सुपरवायझर सुनीलकुमार दास याने रत्नागिरी येथील सुपरवायझर सूर्यकांत पानी यांच्या संगनमताने चोरी करून भंगारवाला फुरकखान मलिक याला विकली होती.

ही घटना २६ जून रोजी घडली होती. दरम्यान रत्नागिरी येथे ही चोरी उघड झाली. या प्रकरणातील तीनही आरोपींना रत्नागिरी पोलिसांनी सिंधुदुर्ग पोलिसांच्या ताब्यात दिले. या प्रकरणाचा तपास कुडाळचे पोलीस उपनिरीक्षक सागर शिंदे करीत होते. त्यांनी व त्यांच्या पथकाने रत्नागिरी येथे जाऊन एक टेम्पो आणि तांब्याची तार भंगारवाला फुरकखान मलिक यांच्याकडून हस्तगत केली.

दरम्यान या तिघांनाही कुडाळ न्यायालयात हजर केले असता कुडाळ पोलिसांनी या आरोपींकडून अजून एक आयशर टेम्पो आणि तांब्याची तार हस्तगत करण्यात करायची आहे.

त्यामुळे पोलीस कोठडी मिळावी अशी मागणी केली होती या मागणीच्या प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांनी विचार करून ८ जुलै पर्यंत पोलीस कोठडीसुनावली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here