महाराष्ट्रातील मराठा आरक्षणावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

0
136

मराठा आरक्षण वैध ठरवण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधातील अपिलांवर मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. नवनियुक्त सरन्यायाधीश न्यायमूर्ती शरद बोबडे, न्यायमूर्ती संजीव खन्ना व न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होईल.मराठा समाजाकडून दीर्घ काळापासून होत असलेली मागणी तसेच ५८ मूकमोर्चे काढण्यात आल्यानंतर राज्य सरकारने मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीमध्ये १६ टक्के आरक्षण देण्याची घोषणा केली होती. मात्र, कायद्याद्वारे दिलेले आरक्षणाचे १६ टक्क्यांचे प्रमाण १२-१३ टक्के कमी करून तो वैध ठरवणारा निर्णय उच्च न्यायालयाने २७ जूनला दिला. त्याविरोधात जयश्री पाटील यांच्यासह अन्य अनेक विरोधी जनहित याचिकादारांनी लगेचच सर्वोच्च न्यायालयात अपील केली होती. याप्रकरणी मराठा समाजाला देण्यात आलेल्या आरक्षणाविरोधात आज मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात सुणावणी होणार आहे. या सुनावणीसाठी राज्य सरकारची बाजू मांडण्याकरता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी माजी अटर्नी जनरल मुकूल रोहतोगी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आज होणाऱ्या सुणावणीवर मराठा आरक्षणाचे भवितव्य अवलंबून असल्याने आजच्या सुणावणीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here