महामार्ग समस्यांबाबत सिंधुदुर्गात काँग्रेसची लोकअदालत

0
116

सिंधुदुर्ग – मुंबई-गोवा महामार्गाची दयनीय अवस्थेबाबतचा पाढा मंगळवारी खारेपाटण ते झाराप अशा ठिकाणच्या नागरिकांनी काँग्रेसने घेतलेल्या महामार्गप्रश्नी लोकअदालतीमध्ये जिल्हाध्यक्ष बाळा गावडे यांच्याकडे वाचला. जनतेच्या समस्या ऐकून गावडे यांनी यासंदर्भात लवकरच सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांच्या कानी बाब घालून महामार्ग सुरळीत करण्यास अधिकाऱयांना भाग पाडू, असे गावडे यांनी स्पष्ट केले. यावेळी नागरिकांनी निवेदनही गावडे यांना दिले.

काँग्रेस पक्षाच्यावतीने मुंबई-गोवा महामार्गाच्या दयनीय स्थितीबाबत खारेपाटण, नांदगाव, कणकवली, ओरोस, कुडाळ, झाराप आदी भागातील जनतेच्या समस्या समजून घेण्यासाठी एक दिवसीय लोकअदालत उपक्रम राबविला. यावेळी उपाध्यक्ष व प्रवक्ते इर्शाद शेख, सरचिटणीस प्रकाश जैतापकर, उपाध्यक्ष नागेश मोर्ये, सरचिटणीस चंद्रशेखर जोशी, महिला जिल्हाध्यक्षा साक्षी वंजारी, माजी जिल्हाध्यक्ष साईनाथ चव्हाण, विद्याप्रसाद बांदेकर, उल्हास शिरसाट, मेघनाथ धुरी, कणकवली तालुकाध्यक्ष महेंद्र मांजरेकर, सावंतवाडी तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर, वैभववाडी दादामिया पाटणकर, अरुण टेंबुलकर, प्रवीण वरुणकर, उपसभापती सिद्धेश परब, नीलेश मालवणकर, सूरज सुतार, ऍड. राघवेंद्र नार्वेकर, ऍड. संभाजी सावंत, मोहसीन मुल्ला, चैतन्य सावंत, इंद्रनील अनगोळकर, दीपक पिळणकर, अमेय सुकी, अनिल परब, कौस्तुभ गावडे, दिगंबर परब, विजय प्रभू आदी उपस्थित होते. महामार्ग स्थितीबाबत येत्या दोन दिवसात बांधकाम अधिकाऱयांना जाब विचारला जाणार आहे, असे गावडे यांनी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here