मक्याची कणसे विकणार्यात कोमलला व्हायचे आहे आय पी एस दहावीच्या परीक्षेत मिळवले ७३ टक्के गुण

0
163

 

सिंधुदुर्ग – दहावी शालांत परिक्षेचा निकाल आज जाहीर झाला. सिंधुदुर्गात अनेक विद्यार्थ्यांनी यश मिळविले. पंरतु या यशस्वीतेत लक्ष वेधणार यश मिळविले आहे .ते कोमल ज्ञानेश्वर इंगळे या विध्यामंदिर हायस्कूल कणकवलीच्या विद्यार्थीनीने. एप्रिल मे मध्ये फळ विकून आणि आता हातगाडीवर मक्याची कणस विकून आपल्या कुटुंबाला हातभार लावणाऱ्या या मुळीच यश नक्कीच कौतुकास्पद आहे. या यशाला गरीबीची, कष्टाची आणि जिद्दी ची किनार आहे.

आजही कोमल मक्याची कणसे हातगाडीवर मिळालेल्या यशाने आनंदाने विकते आहे. कोमलचे आई वडील बुलढाणा जिल्ह्य़ात आपल्या गावी गेलेत ते तीथेच अडकून पडले आहेत. मात्र जेव्हा उपासमार होणार हे लक्षात येताच कोमलने वडिलांची फळ विक्रीची हातगाडी नरडवे रोडवर लावली. आता पावसाळी हंगाम सुरू झाल्यावर कोमलने नरडवे नाक्यावर भाजलेली मक्याची कणस विकायला सुरूवात केली. सध्या तिच्या या व्यवसायाला चांगला प्रतिसाद मिळतो आहे.

कोमलने आज लागलेल्या दहावीच्या परीक्षेत ७३ टक्के गुण मिळविले आहेत. कणकवली येथील विद्यामंदिर हायस्कुल मध्ये ती शिकते. तिला शिकून आय पी एस व्हायचं आहे. असं ती सांगते. कोमलचे दहावीतील हे यश म्हणजे तिची मेहनत आहे. तिच्या या यशाबद्दल अनेकांनी तिचे कौतुक केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here