निलेश सावंत यांच्या नाद गोटफार्ममध्ये 15 लाखांची शेळी

0
310

सिंधुदुर्ग – कणकवली तालुक्यातील भिरवंडे गावामध्ये उच्चशिक्षित इंजिनीयर पदवी प्राप्त निलेश सावंत यांनी परदेशी जातीच्या आफ्रिकन बोर शेळीचे पालन करून सुसज्ज असा नाद गोटफार्म उभारला आहे निलेश सावंत यांनी बोलताना सांगितले की आपल्या या फार्ममध्ये तब्बल पंधरा लाखाच्या 4 शेळ्या उपलब्ध असून अन्य शेळ्यांची किंमत मिळून जवळ-जवळ 1 ते दीड कोटीच्या शेळ्या आपल्याकडे आहे.

 

या शेळ्यांचा आयुष्य तब्बल दहा ते बारा वर्ष असते. एका वर्षात ह्या शेळ्यांचे वजन जवळपास 100 ते 120 किलो होते. एका वेतात ही शेळी दोन ते पाच पिल्लांना जन्म देऊ शकते. आफ्रिकन बोर या शेळेची ही प्रजाती उष्ण तापमान व थंड तापमानात देखील राहू शकते. भविष्य हे आफ्रिकन बोअर शेळ्यांचेच असणार. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी व युवकांनी या प्रजातीचे पालन केल्यास भविष्यात मोठा फायदा आपल्याला होऊ शकतो असे निलेश सावंत यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here