जिल्ह्यात आणखी एका रुग्णाचा कोरोना आहवाल पॉजिटीव्ह – जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी

0
218

 

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज आणखी एका रुग्णाचा कोरोना तपासणी आहवाल पॉजिटीव्ह आला आहे. मुंबईवरून आलेल्या एका 17 वर्षीय युवतीस कोरोनाची लागन झाल्याचे निष्पन्न झाले आहे. मुंबईहून 5 कुटुंबिया जिल्ह्यात आले आहेत. जिल्ह्यात प्रवेश केल्यानंतर तिच्यासह तिच्या कुटुंबियांची कुडाळ येथे ग्रामिण रुग्णालयात त्यांची तपासणी करण्यात आली होती व त्यांना तात्काळ संस्थात्मक अलगीकरणाक ठेवण्यात आले होते. मुंबई येथील कॉन्टेनमन्ंट झोनमधून आल्यामुळे त्यांचा स्पॅब तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. त्यामध्ये तिच्या कुटुंबियातील इतर व्यक्तींचा नमुना अहवाल निगेटीव्ह आला तर या युवतीचा अहवाल पॉजिटीव्ह आला आहे. सदर युवतीस कोणत्याही प्रकारची लक्षणे आढळलेली नाहीत. आता जिल्ह्यात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या पुन्हा एक अशी झाली आहे.
पोलीस, आरोग्य व महसूल विभागाने समन्वयाने राबवलेल्या नियोजनामुळे जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार रोखता आल्याचे जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी सांगितले. आज पॉजिटीव्ह अहवाल आलेल्या युवतीस वेळीत अलगीकरणात ठेवण्यात आले होते. त्यामुळे तिच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची संख्या अत्यंत कमी आहे. तसेच या कुटुंबियांना सिंधुदुर्ग येथे घेऊन आलेले वाहन चालक पुन्हा मुंबई येथे परतले आहेत. त्याविषयी मुंबई येथे प्रशासनास माहिती देण्यात आली असल्याचे जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी सांगितले.
नवीन पॉजिटीव्ह अहवाल आलेल्या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची माहिती घेण्याचे काम सुरू असून त्या क्षेत्रामध्ये प्रतिबंधात्मक उपाययोजनांची कार्यवाही आरोग्य यंत्रणेकडून सुरू करण्यात आली आहे. सध्या या रुग्णाची प्रकृती चांगली असून तिला जिल्हा सामान्य रुग्णालयातील विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.
सावंतवाडी येथील एक गरोदर महिला मुंबई येथून आली आहे. तिला सावंतवाडी येथे सोडण्यासाठी आलेले तिचे मामा आज कोल्हापूर येथे कोरोना पॉजिटीव्ह असल्याचे समजले आहे. सदर महिलेची तपासणी करण्यात आली असून तिचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. तिने 25 एप्रिल 2020 रोजी जिल्हा रुग्णालय येथे एका अपत्यास जन्म दिला असून माता व बालक दोन्ही तंदरूस्त आहेत.
जिल्हा रुग्णालयातील विलगीकरण कक्षात सध्या 69 रुग्ण दाखल आहेत. जिल्ह्यातून तपासणीसाठी आजपर्यंत एकूण 349 नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. त्यापैकी 316 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर अजून 33 नमुन्यांचा अहवाल अप्राप्त आहे. तर आरोग्य विभागातर्फे आज 2720 रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे. सध्या जिल्ह्यात 228 व्यक्तींना घरीच अलगीकरण करण्यात आले असून 110 व्यक्ती संस्थात्मक अलगीकरणात आहेत.

अ.क्र विषय संख्या
1 घरीच अलगीकरण करण्यात आलेले 228
2 संस्थात्मक अलगीकरणात असलेले 110
3 पाठविण्यात आलेले एकूण नमुने 349
4 अहवाल प्राप्त झालेले नमुने 316
5 आतापर्यंत पॉजिटीव्ह आलेले नमुने 2
6 निगेटीव्ह आलेले नमुने 314
7 अहवाल प्राप्त न झालेले नमुने 33
8 विलगीकरण कक्षात दाखल रुग्ण 69
9 सध्यस्थितीत जिल्ह्यातील पॉजिटीव्ह रुग्ण 01
10 आज रोजी तपासणी करण्यात आलेल्या व्यक्ती 2720

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here