26.6 C
Panjim
Wednesday, June 29, 2022

जनता कर्फ्युच्या नावाखाली प्रशासनाची दंडेलशाही, शिवसेना नेते संदेश पारकर यांनी वेधले जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांचे लक्ष

spot_img
spot_img
spot_img
spot_img

सिंधुदुर्ग – शहरातील जनता कर्फ्युच्या नावाखाली प्रशासनाची दंडेलशाही थांबली पाहिजे अशी मागणी करत शिवसेना नेते संदेश पारकर यांनी जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांची भेट घेतली. यावेळी अत्यावश्यक सेवेतील सर्व आस्थापना तात्काळ सुरू करण्याचे आदेश आपण संबंधितांना देते असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. त्यामुळे कणकवलीत मेडिकल, रेशनिंग दुकान आणि सार्वजनिक आस्थापना आता सुरू होणार आहेत.

कणकवली शहरात नगरपंचायतीने जनता कर्फ्यु लागू केला आहे. या कर्फ्युत अत्यावश्यक सेवेत असलेली रेशनिंग दुकान, मेडिकल स्टोअर्स, हॉस्पिटल, भाजी दुकान, बँका बंद ठेवण्यात आल्या आहेत. याकडे संदेश पारकर यांनी जिल्हाधिकारी यांचे लक्ष वेधले. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनता कर्फ्यु लागू केला तेव्हादेखील अत्यावश्यक सेवेतील आस्थापना बंद केली नव्हती मात्र कणकवलीत ही दंडेलशाही कशाला असा प्रश्न संदेश पारकर यांनी विचारला. याबाबत आपण तात्काळ प्रांताधिकारी व तहसीलदार यांच्याकडून माहिती घेऊन अत्यावश्यक सेवेतील सार्वजनिक व सरकारी आस्थापना तात्काळ सुरू करण्याचे आदेश देत असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.

*प्रशासनाकडून जनता कर्फ्युचे आदेश नाहीत – जिल्हाधिकारी*

प्रशासकीय पातळीवर या जनता कर्फ्युचे काही आदेश आहेत का असे पारकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना विचारले असता, असे कोणतेही आदेश प्रशासनाकडून दिले नसल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. दरम्यान जनतेने स्वयंसपूर्तीने हा कर्फ्यु पाळला तर आपला विरोध नाही मात्र कोणी जबरदस्ती करू नये अशी भूमिका पारकर यांनी मांडली. या भूमिकेला सहमती दर्शवत जनतेने स्वयंसपूर्तीने कर्फ्यु पाळायला आपलाही विरोध नाही असे जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केले. मात्र शासकीय आस्थापना बंद असतील तर त्याची प्रशासन नक्कीच दखल घेईल, तसेच त्यांना नोटिसा बजावल्या जातील असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.

*संदेश पारकर यांनी वेधले बाकी अधिकाऱ्यांचे लक्ष*

संदेश पारकर यांनी यावेळी कणकवली तहसीलदार रमेश पवार, जिल्हा पुरवठा अधिकारी दादासाहेब गीते, कणकवली नगर पंचायतीचे सीईओ दवले यांचीही भेट घेतली आणि कणकवलीतील स्थिती त्यांच्या लक्षात आणून दिली. तर जिल्हा ड्रग्स अँड फूड इन्स्पेक्टर राजपाल यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा केली. यावेळी मेडिकल सेवा बंद ठेवता येणार नाही असे राजपाल यांनी स्पष्ट केले असून आपण तात्काळ संबधित अधिकारी व मेडिकल स्टोअर्स मालकांना आदेश देतो आणि जे शासनाच्या नियमाचे उल्लंघन करेल त्याच्यावर वेळ पडल्याचं लायसन्स रद्द करण्याची कारवाई केली जाईल असेही त्यांनी सांगितले.

तर रेशनिंग दुकानदारांनी तात्काळ दुकाने चालू करावीत असे आदेश देतानाच तात्काळ जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन आपण संबंधितांना आदेश देतो असे जिल्हा पुरवठा अधिकारी दादासाहेब गीते यांनी सांगितले.

*अन्यथा सेना स्टाईलने रस्त्यावर उतरून आंदोलन – पारकर*

दरम्यान शासनाच्या नियमाप्रमाणे अत्यावश्यक सेवेतील दुकाने आणि आस्थाफना सुरू झाली नाहीत तर आपण रस्त्यावर उतरून शिवसेना स्टाईलने आंदोलन करणार असल्याचे संदेश पारकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना इशारा देताना सांगितले. कर्फ्युच्या आदल्या दिवशी कणकवलीत खरेदीसाठी मोठी गर्दी उसळली. यावेळी लोकांची मोठी लूट झाली. 100 ची भाजी 150 ला विकली गेली. ही लूट थांबली पाहिजे असेही पारकर यांनी स्पष्ट केले. यावेळी शैलेश भोगले, राजू शेटये, राजू राठोड, शेखर राणे आदी शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.

*डॉक्टर मागतात कोविड फ्री सर्टिफिकेट, त्यात रुग्णांची होते परवड*

दरम्यान यावेळी संदेश पारकर यांनी जिल्हाधिकारी यांचे खासगी हॉस्पिटलमध्ये डॉक्टर रुग्णांची कशी पिळवणूक करतात याकडे लक्ष वेधले. रुग्ण जेव्हा या खासगी रुग्णालयात जातो तेव्हा त्याच्याकडे त्याला कोविड नसल्याचे सर्टिफिकेट मागितले जाते. मात्र सिरियस रुग्णाला हे सर्टिफिकेट देता येत नाही. कारण कोविड रिपोर्ट यायला किमान 2 दिवस लागतात. मात्र हे सर्टिफिकेट मिळेपर्यंत डॉक्टर उपचार करत नाहीत त्यामुळे कणकवलीत एका महिलेचा मृत्यू झाला आहे. तर एक हात कापलेला रुग्ण रुग्णालयात गेला तर त्याचे रक्त वाहत असतानाही त्याच्याकडे कोविड सर्टिफिकेट नसल्याने त्याच्यावर खासगी रुग्णालयातील डॉक्टरने उपचार केले नाहीत याकडे पारकर यांनी जिल्हाधिकारी यांचे लक्ष वेधले आणि रुग्णांची ही परवड थांबवा अशी मागणी केली. याबाबत आपण तात्काळ आदेश देतो असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.

elthor-showroom-ad
triumph-high school-ad

Latest On Hub Encounter

YouTube player

Latest on Passay

YouTube player
- Advertisement -spot_img
spot_img
spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
YouTube player

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

More Articles

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img