25.2 C
Panjim
Friday, May 20, 2022

चिपी विमानतळावर वन्य प्राण्यांचा धोका चिपी विमानतळाच्या मुख्य गेटवर कडेकोट पहारा द्या अशा आयआरबीला खासदार राऊत यांच्या सूचना

spot_img
spot_img
spot_img

Latest On Hub Encounter

Latest on Passay

सिंधुदुर्ग – चिपी विमानतळावर जंगली प्राण्यांचा धोका वाढत आहे. वन्य प्राण्यांचा वावर दिसून येत असल्यामुळे विमान सेवेला अडथळा निर्माण होत आहे. हा अडथळा दूर करण्यासाठी विमानतळावरील अधिकाऱ्यांना सक्त सूचना देण्यात आल्याचं विनायक राऊत म्हणाले. चिपी विमानतळाच्या चारी बाजूने आवार भिंत आहेच या भागाने जंगली प्राणी म्हणजे कोल्हे विमानतळावर येतात, मुख्य गेटवर तिथे सातत्याने पहारा ठेवा, तिथल्या जाळ्या व्यवस्थित बसवा, अशा सूचना एअरपोर्ट आयआरबीला दिलेले आहेत असेही ते यावेळी म्हणाले.

धावपट्टीवर तब्बल २५ ते ३० सोनेरी कोल्ह्यांचा वावर

सिंधुदुर्ग जिल्ह्यात चिपी विमानतळ सुरू झाले. विमानतळाची उभारणी करण्यासाठी मागील २० वर्षांपासून अनेक प्रकारचे विघ्न समोर आले आहेत. परंतु आता पुन्हा एकदा नवीन समस्या निर्माण झाली आहे. कारण चिपी विमानतळावर विमानं धावण्याऐवजी कोल्ह्यांची धावपळ सुरू आहे. विमानतळाच्या धावपट्टीवर तब्बल २५ ते ३० सोनेरी कोल्हे वावरत असतात. त्यामुळे आता यावर तोडगा कसा काढणार, हा एक नवीन प्रश्न उपस्थित झाला आहे.

विमानांना उतरण्यास मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे

स्थानिक वन विभाग आणि विमान प्राधिकरण यांना या सोनेरी कोल्ह्यांना पकडण्यासाठी परवानगीची गरज आहे. त्यांना पकडल्यानंतर इतर जागी हलवण्याची आवश्यकता आहे. परंतु विमानतळाच्या परिसरात जवळपास २५ ते ३० कोल्ह्यांचा वावर सुरू असून मुंबईवरून सिंधुदुर्गाकडे येणाऱ्या विमानांना उतरण्यास मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. मुंबईहून सिंधुदुर्ग या मार्गावर विमानाच्या दररोज तीन फेऱ्या होत असतात. परंतु कोल्ह्यांच्या सिंधुदुर्ग विमानतळावरील धावपट्टीमुळे वैमानिकांना विमान उतरवण्यास मोठा त्रास देखील होत आहे.

कोल्ह्याची शिकार करणे किंवा त्यांचा व्यापार करणे हा दंडनीय गुन्हा

मिळालेल्या माहितीनुसार, या विमानतळाच्या २७५ एकर भूभागाजवळ एक संरक्षण भिंत बांधण्यात आली आहे. तसेच विमानतळाभोवती एका मोठे गवत देखील उभे राहीले आहेत. त्यामुळे कोल्ह्यांचा अधिकप्रमाणे वावर वाढत असल्याचं सांगितलं जात आहे. वन्यजीव संरक्षण कायद्याच्या अनुसूची दोन अंतर्गत कोल्ह्यांना संरक्षण देण्यात आले आहे. हे कोल्हे सर्व प्रकारचे फळं, पक्षी, कीटक, मासे आणि लहान प्रकारचे सस्तन प्राणी खातात. तसेच कोल्ह्याची शिकार करणे किंवा त्यांचा व्यापार करणे हा दंडनीय गुन्हा आहे.

विनायक राऊत यांच्या पहारा देण्याच्या सूचना

दरम्यान खासदार विनायक राऊत यांनी विमानतळ कंपनी असलेल्या आयआरबीला या ठिकाणी कडेकोट पाहायला देण्याच्या सूचना दिल्या आहेत. विमानतळावर विमान लँडिंग होताना कोणताही अपघात घडू नये याबाबत ची काळजी विमानतळ प्रशासनाने घ्यावी असेही खासदार विनायक राऊत यांनी म्हटले आहे.

elthor-showroom-ad
triumph-high school-ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

- Advertisement -spot_img