26 C
Panjim
Wednesday, September 28, 2022

गोमचिम2019 च्या समारोपाला आदित्य कोठारेच्या पाणीचा प्रीमियर

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

गोवा: 28,29 आणि 30 जून रोजी विन्सन वर्ल्डतर्फे आयोजित 12 व्या गोवा मराठी चित्रपट महोत्सवात यंदाही दरवर्षी प्रमाणे मराठी मधील नवे कोरे दर्जेदार सिनेमा पाहण्याची संधी गोमंतकीयांना मिळणार आहे.
12 व्या गोवा मराठी चित्रपट महोत्सवाच्या प्रतिनिधी नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतआहे.www.bookmyshow.com बरोबरच पणजी, मडगाव,फोंडा,म्हापसा आणि वास्को शहरात प्रतिनिधी नोंदणी करता येणार आहेत.

महोत्सवात सादर होणारे चित्रपट खालीलप्रमाणे :

1        आरोन


महाराष्ट्रातल्या एका छोट्याशा गावात राहणारा बाबू गेली 15 वर्षे आपल्या आईला भेटलेला नाही. त्याची आई कामानिमित्ताने पॅरीसमध्ये अडकून राहिलीआहे. बाबू आणि त्याचा एक काका, ज्याच्यावर बाबूला आईकडे घेऊन जाण्याची जबाबदारी आहे, पॅरीसला जाण्यास निघतात. हा प्रवास या दोघांसाठी एकअविस्मरणीय टप्पा बनून जातो. बाबूचे सतत आईकडे धावणारे मन त्याच्या काकाला माणसाच्या स्वभावाची, भावनांची नव्याने ओळख करून देते.

चित्रपट महोत्सवातला
सहभाग :

वॉशिंग्टनडीसी साउथ रशियन

वर्ल्डस्इंडपेंडेंट फिल्म फेस्टिव्हल

सॅनफ्रान्सिस्को

पाँडिचेरीइंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल

औरंगाबादइंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल

सीएफकेफिल्म फेस्टिव्हल, लंडन

कालावधी : 1 तास 56 मिनिटे
दिग्दर्शक : ओंकार शेट्टी
कलाकार : शशांक केतकर, स्वस्तिका मुखर्जी, नेहा जोशी, अथर्व पाध्ये

2        पाणी


दुष्काळ, पाणी आणि प्रेम या तीन घटकांचा प्रभावी उपयोग करून या चित्रपटाचे कथानक आकार घेते. दुष्काळाविरुद्ध लढण्यासाठी आपला गाव एकत्रयेऊच शकणार नाही, याची खात्री असलेला बालाजी शेवटी जिद्दीने पाणी आणि प्रेम कसे मिळवतो, याची ही संघर्षमय कहाणी.
प्रियांका चोप्रा यांची निर्मिती असलेला हा बहुचर्चित चित्रपट यंदाच्या गोवा मराठी चित्रपट महोत्सवाचा उद्घाटनाचा चित्रपट आहे.

कालावधी : 2 तास 30 मिनिटे
दिग्दर्शक : आदिनाथ कोठारे
कलाकार : आदिनाथ कोठारे, रुचा वैद्य, सुबोध भावे, रजत कपूर

3        मिरांडा हाउस

गोव्याच्या निसर्गसुंदर पार्श्वभूमीवर घडणारी ही गोष्ट आहे. समीर, प्रिया आणि विक्रम या तिघांत वेगाने घडणार्‍या घटनांमधून ही गोष्ट आकार घेते. यातिघांचेही अवकाश आळीपाळीने जणू बुद्धिबळाच्या पटावरच्या सोंगट्यांप्रमाणे वेगाने बदलत राहते; कोण राणी आणि कोण शिपाई याचा पत्ता न लागता. कोण कोणाला खेळवतो? शेवटी कोण जिंकतो? का खेळवणाराही भलताच असतो?

कालावधी : 1 तास 20 मिनिटे
दिग्दर्शक : राजेंद्र तालक
कलाकार : मिलिंद गुणाजी, साईकांत कामत, पल्लवी सुभाष, जॉन डिसिल्वा

4        मुळशी पॅटर्न


मुळशी पॅटर्न ही फक्त एका तालुक्याची नव्हे तर संपूर्ण देशाची गोष्ट आहे. 1991 च्या आर्थिक उदारीकरणानंतर शहरांच्या कडेच्या गावात औद्योगिकवसाहती वसल्या व जमिनीला सोन्याचा भाव आला. शेतकर्‍यांना जमिनी विकून लाखो रुपये मिळाले खरे; पण त्या पैशांची गुंतवणूक कशी करावी, हे नसमजल्यामुळे त्यांच्या हातात ना पैसा राहिला ना जमीन. अशाच एका शेतकर्‍याच्या पुढील पिढीच्या प्रतिनिधीची ही गोष्ट. शेतकरी कुटुंबातला राहुलगुन्हेगारी जगतातील भाई कसा बनतो, त्याची ही गोष्ट.
कालावधी : 2 तास 27 मिनिटे
दिग्दर्शक : प्रवीण तरडे
कलाकार : ओम भुतकर, मालविका गायकवाड, मोहन जोशी, सविता मालपेकर
5        कागर


आयुष्याच्या उमलत जाणार्‍या काळात अंकुरणारे प्रेम आणि भोवतालची राजकीय सत्तासंघर्षाची खेळी ही या चित्रपटाची पार्श्वभूमी. राणी ही एक हुशारआणि सुसंस्कृत मुलगी आहे. युवराज हा राजकारणात करिअर करू पाहणारा निधडा तरुण आहे. गुरुजी हे राजकारणातले महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व, जेइतरांसाठी आदर्शवत असेच आहे. जेव्हा राणी युवराजच्या साथीने आपल्या भविष्याची स्वप्ने पाहत असते त्याचवेळी गुरुजी आपल्या राजकीय सामर्थ्यआणि सत्तेच्या मागावर असतात. वाटा एकमेकांना छेदून जायच्याच असतात.
कालावधी : 2 तास 12 मिनिटे
दिग्दर्शक : मकरंद माने
कलाकार : सुहास पळशीकर, रिंकू राजगुरू

6        खटला-बिटला

जेव्हा बेकायदेशीर कृत्याच्या संशयातून पोलिस एका निमशहरी लॉजवर छापा टाकतात तेव्हा त्यांना तिथे आत्महत्येच्या प्रयत्नात असलेले एक जोडपेआढळते. वैतागलेले पोलिस त्यांना ‘खास आणि फास्ट ट्रॅक’ न्यायालयात सादर करतात.
कालावधी : 1 तास 40 मिनिटे
दिग्दर्शक : परेश मोकाशी
कलाकार : अभिजित पवार, ज्योती वायदांडे, मंगेश कदम, आश्विनी निमकर
.
7        दिठी


वारकरी पंथाचा अवलंब करत असलेला रामजी हा व्यवसायाने लोहार आहे. पंढरपूरची नित्य वारी करणारा तो निस्सीम विठ्ठलभक्त आहे; मात्र पूरआलेल्या नदीत जेव्हा त्याचा मुलगा वाहून जातो तेव्हा त्याचे सारेच भावविश्व कोसळते. आयुष्यभर ज्याची भक्ती केली त्या देवासही तो दूर सारतो. पुढेएक असा प्रसंग येतो की त्यात जन्म आणि मृत्यूबद्दलचे त्याचे आभास विरून त्यात त्याला एकात्मता जाणवून येते.
राष्ट्रीय पारितोषिकप्राप्त सुमित्रा भावे यांचा हा आणखीन एक अभिजात चित्रपट. कोल्हापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात या चित्रपटाला यंदा मराठीविभागात उत्कृष्ट चित्रपटाचा मान प्राप्त झाला आहे.
कालावधी : 1 तास 30 मिनिटे
दिग्दर्शक : सुमित्रा भावे
कलाकार : किशोर कदम, मोहन आगाशे, अमृता सुभाष, अंजली पाटील

8        इमेगो


ल्युकोडर्मा (कोड) ही व्याधी घेऊन जगणारी नम्रता आपल्याच कोषात मग्न असणारी शालेय विद्यार्थिनी आहे. तिच्या अंगावरचे कोड तिला इतरांपासूनअलिप्त ठेवतात. तिच्या शाळेत एका नवीन तरुण आणि उल्हासित शिक्षकाचा प्रवेश होतो. स्वातंत्र्य आणि आत्मभान यावरच्या त्याच्या निस्सीमविश्वासाचे पडसाद नम्रताच्याही आयुष्यात एक नवीन अवकाश निर्माण करतात.
कोल्हापूर इंटरनॅशनल चित्रपट महोत्सवात या चित्रपटाला उत्कृष्ट दिग्दर्शनासह अनेक पुरस्कार प्राप्त झाले. गेल्या वर्षीच्या मामी चित्रपट महोत्सवाततसेच इफ्फीच्या फिल्मबझारमध्ये या चित्रपटाचा सहभाग होता.
कालावधी :
दिग्दर्शक : करण चव्हाण
कलाकार : ऐश्वर्या गायधर, अमोल देशमुख
.
9        बस्ता


लग्न ठरवल्यावर असतो बस्ता… लग्नातला सगळ्यात महत्त्वाचा आणि नाजूक प्रकार. नवरा-नवरी आणि नातेवाइकांसाठी यात कपड्यांची खरेदी असते; पण अनेकदा बस्त्यातच लग्न मोडायची पाळी येते. अशाच एका लग्नाच्या बस्त्यानिमित्ताने घडणारी ही अडथळ्यांच्या शर्यतीची गमतीदार गोष्ट.
कालावधी : 2 तास
दिग्दर्शक : तानाजी घाडगे
कलाकार : सुहास पळशीकर, सायली संजीव, पार्थ भालेराव, ज्योती सुभाष, भारत गणेशपुरे

10   भोंगा


धर्म जीवनापेक्षा मोठा असतो की जीवन धर्मापेक्षा मोठे? एका मुस्लीम कुटुंबातले नऊ महिन्यांचे अर्भक एका असाध्य रोगाने आजारी आहे. कौटुंबिकसमस्येमुळे या कुटुंबाला आपले घर बदलावे लागते. त्यांना नवीन घर मिळते ते नेमके एका मस्जिदीसमोर. या मस्जिदीमधून वारंवार लाऊडस्पीकरवरूनहोणार्‍या अजानामुळे अर्भकावर विपरीत परिणाम घडायला सुरुवात होते. कुटुंब आणि शेजारी हा आवाज (लाऊडस्पीकर) कमी करण्यासाठी खूप प्रयत्नकरतात; पण त्यांना यश मिळत नाही.
राष्ट्रीय पारितोषिकप्राप्त शिवाजी लोटन पाटील यांचा हा चित्रपट धर्माकडे पाहण्याच्या नवीन दृष्टीचा स्वीकार करायला सुचवतो.
कालावधी : 1 तास 35 मिनिटे
दिग्दर्शक : शिवाजी लोटन पाटील
कलाकार : श्रीपाद जोशी, कपिल कांबळे, आकाश घरत, दीप्ती धोत्रे

11   म्होरक्या


शाळेत जायला उत्सुक नसलेल्या मुलाला गुरुजींच्या सांगण्यावरून इतर मुले खेचत शाळेत आणतात. इथून या सिनेमाच्या गोष्टीला प्रारंभ होतो.प्रजासत्ताकदिनी शिक्षकांना या मुलाच्या प्रभावी आवाजाचा शोध लागतो आणि हा मुलगा जणू एका स्पर्धेत उतरतो. दैन्य, भेदभाव यासारख्या गृहीतधरलेल्या अडथळ्यांतून मार्ग काढू पाहणार्‍या एका म्होरक्याची ही गोष्ट.
कालावधी :
दिग्दर्शक : अमर दिवकर
कलाकार :

12   नाळ


चैतन्य नावाच्या एका खोडकर मुलाची ही गोष्ट आहे. महाराष्ट्रातल्या एका खेडेगावात तो आपल्या प्रेमळ आईवडिलांबरोबर राहत असतो. अवचित त्यालात्याच्या संबंधातल्या एका महत्त्वाच्या गोष्टीची माहिती होते आणि त्याचे भावनाशील जगच बदलून जाते.
कालावधी : 2 तास
दिग्दर्शक : सुधाकर रेड्डी यंकटी
कलाकार : श्रीनिवास पोकळे, नागराज मंजुळे, देविका दफ्तरदार

13

गढूळ

आई आणि मुलगा यांच्यामधल्या नात्याची ही गोष्ट आहे. वडिलांच्या मृत्युदिनी अशी एक घटना घडते जी त्यांच्यामधल्या नात्याला एक दु:खदायकवळण देऊन जाते आणि प्रश्नचिन्ह निर्माण करते.
कालावधी : 2 तास 5 मिनिटे
दिग्दर्शक : गणेश शेलार
कलाकार : स्मिता तांबे, अविनाश चाबुकस्वार, श्रीकांत यादव

14   सूर-सपाटा


‘कबड्डी’च्या ध्यासाने झपाटलेल्या मुलांची ही गोष्ट आहे. एका कबड्डी स्पर्धेत भाग घेण्यासाठी ही मुले चुकीच्या मार्गाचा अवलंब करतात. मात्र जेव्हास्पर्धा जिंकून ट्रॉफी उंचवायची वेळ येते तेव्हा मात्र एक नवीन जाणीव त्यांच्या अंतरात उदयाला येत असते. कसली असते ही जाणीव?
कालावधी : 2 तास 22 मिनिटे
दिग्दर्शक : मंगेश कथकले
कलाकार :

15   वेडींगचा सिनेमा


मुंबईमधली एक नवोदित फिल्ममेकर, एका छोट्याशा गावातल्या लग्नसमारंभाचे चित्रण करण्याची जबाबदारी घेते. त्या लग्नातला उत्साह, गोंधळआणि नाट्य यात ती अवचितपणे गुंतून जाते. या सगळ्या अंदाधुंदीच्या शेवटी शहरातली फिल्मवाली बाई आणि त्या छोट्याशा गावातले गावकरीयांच्यापाशी एकमेकांना देण्यासारखे खूप काही असते.
कालावधी : 2 तास 20 मिनिटे
दिग्दर्शक : सलील कुलकर्णी
कलाकार : मुक्ता बर्वे, भाऊ कदम, शिवाजी साटम, अलका कुबल

triumph-high school-ad

Latest On Hub Encounter

YouTube player

Latest on Passay

YouTube player

Latest on Unsung Hero

YouTube player

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img