21.7 C
Panjim
Sunday, March 26, 2023

कासार्डे येथे विहिरीत पडून बिबट्याचा मृत्यू मानवी वस्तीजवळ थेट बिबट्यांचा वावर असल्याने परीसरात भीतीचे वातावरण

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

सिंधुदुर्ग – कासार्डे प्राथमिक आरोग्य केंद्राजवळ विहीरीत पडून बिबट्याचा मृत्यू झाला. दरम्यान भरवस्तीत बिबट्या घुसत असल्याने भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

कासार्डे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राजवळ असणाऱ्या अतुल मुंडले यांच्या पत्नी घराच्या परसबागेतील विहीरीचा पंप चालु करण्यास गेल्या होत्या. पाणी येत नसल्याने त्यांनी विहीतील पंपात काही बिघाड झाल्याचे पहावयास विहीरीकडे गेल्या असता विहीरीतून काहीतरी आवाज येत असल्याचा संशय आल्यावर त्यांनी आपल्या पतीला याबाबत सांगितले. यानंतर विहीरीत कोणते तरी जनावर पडल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी शेजाऱ्यांना सांगितले. यावेळी विहीरीत बिबट्या पडल्याचे उघड झाले.

यानंतर तातडीने मुंडले यांनी सरपंच बाळाराम तानावडे, पोलीस पाटील महेंद्र देवरुखकर व वनविभागाच्या अधिकाऱ्यांना संपर्क साधत घटनेची माहीती दिली. त्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी करून बिबट्याला वाचवण्यासाठी प्रयत्न केले; मात्र विहीरीत वीस फुटापेक्षा अधिक पाणी तसेच बिबट्याला पाण्यात राहण्यासाठी आसरा मिळत नसल्याने वनविभाग घटनास्थळी पोहचण्यापूर्वी स्थानिक ग्रामस्थांनी बिबट्याला वाचविण्यासाठी कसोटीचे प्रयत्न केले; मात्र वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल होण्यापूर्वीच विहीत पडल्यापासून पाण्यातून बाहेर येण्यासाठी झुंज देणाऱ्या बिबट्याचा मृत्यू झाला. यानंतर घटनास्थळी फोंडा वनपाल शशीकांत साटम, वनरक्षक अतुल सुतार आदी कर्मचारी पोहचले.

बिबट्याला बाहेर काढण्यासाठी वनविभाग व ग्रामस्थांनी साखळी गळ टाकून मृत बिबट्याचे शव बाहेर काढण्याचा प्रयत्न केला; मात्र सर्व प्रयत्न अयशस्वी झाले. सायंकाळ झाल्यानंतर शोधमोहीम थांबविण्यात आली. दुसऱ्यादिवशी पुन्हा एकदा पाण्यात तरबेज पोहणारे घोरपी समाजाचे धोंडी जाधव, राजेंद्र जाधव, सत्यवान होळकर, अनंत जाधव यांना पाचारण करुन विहीरीत उतरून शोध मोहीम सुरु करून लोखंडी गळ व काढीने पाणी हलवून मृत बिबट्याचा शोध घेण्यास सुरवात केल्यानंतर मृत बिबट्याचे शव हाती लागले.

यानंतर बिबट्याचा शव विहीरीतून बाहेर काढत वनपाल शशीकांत साटम, अतुल पाटील, सरदार मनेर व इतर कर्मचाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आला. हा बिबट्या सुमारे दोने ते अडीच वर्षाचा असल्याचा अंदाज वनविभागाकडून वर्तविण्यात आला. बिबट्याचे शवविच्छेदन व अंत्यसंस्कारासाठी फोंडाघाट वनक्षेत्रकडे नेण्यात आले. मानवी वस्तीजवळ थेट बिबट्यांचा वावर असल्याने परीसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

Latest On Our Channel

YouTube player

Latest On Hub Encounter

YouTube player

Latest on Passay

YouTube player

Latest on Unsung hero

YouTube player
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles