26 C
Panjim
Wednesday, May 18, 2022

करुळ घाटात मिनीबसवर ट्रक पलटी, सोळा महिला बालबाल बचावल्या घाटातील वाहतूक ठप्प; जवळपास दोनशे वाहने घाटात अडकून

spot_img
spot_img
spot_img

Latest On Hub Encounter

Latest on Passay

 

सिंधुदुर्ग – करूळ घाटात धोकादायक वळणावर मिनीबसवर ट्रक पलटी होऊन अपघात झाला. या अपघातात मिनीबसमधील सोळा महिला बालबाल बचावल्या आहेत. अपघातानंतर दारुच्या नशेत असलेला ट्रक चालक घटनास्थळावरून जंगलाच्या दिशेने पळून गेला आहे. घाट मार्गातील वाहतूक सहा तास ठप्प झाली आहे.

अपघातातील दोन्ही वाहने रस्त्यात अडकून पडल्याने मार्ग बंद आहे. दोन्ही बाजूंने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. जवळपास दोनशे अवजड वाहने घाटात अडकून पडली आहेत. पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. हा अपघात शुक्रवारी पहाटे च्या सुमारास घडला आहे.

पुणेहुन तारकर्लीकडे मिनीबस (क्रमांक एमएच १२ – एचबी २२९५) करुळ घाट मार्गे पहाटे साडेतीनच्या सुमारास जात होती. दरम्यान पाठीमागून ऊसाचे चिफाड घेऊन जाणा-या ट्रकचा (क्र. एमएच ०९-सीए – ११४१) टायर फुटल्याने ट्रक मिनीबस वर पलटी झाला.

या अपघातात मिनीबस दरीत कोसळता कोसळता बचावली आहे. तर अपघात घडवून आणणारा ट्रक चालक घटनास्थळावरून पसार झाला आहे. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. रस्ता मोकळा करण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे.

elthor-showroom-ad
triumph-high school-ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

- Advertisement -spot_img
spot_img
- Advertisement -spot_img