कणकवली नगरवाचनालयाच्या अध्यक्षपदी आमदार नितेश राणेंची फेरनिवड

0
76

 

सिंधुदुर्ग – जिल्ह्यातील नामांकित कणकवली नगर वाचनालयाच्या अध्यक्षपदी आमदार नितेश राणे यांची पुन्हा एकदा अध्यक्षपदी सर्वांनुमते निवड करण्यात आली आहे. वाचनालयच्या कार्यकारिणी मंडळाच्या कालावधीची मुदत संपल्यामुळे नवीन कार्यकारिणी मंडळाची निवड करण्यासाठी मासिक सभेचे आयोजन करण्यात आले होते.

त्यासभेत आमदार नितेश राणे यांची पुन्हा एकदा अध्यक्षपदी निवड करण्यात आली, तर कार्यवाहपदी महम्मद हनीफ आदम पीरखान यांची निवड करण्यात आली असून सह.कार्यवाह म्हणून डी.पी.तानवडे यांची निवड करण्यात आली.

अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल नितेश राणे यांनी सर्व सदस्यांचे आभार मानून पुढील तीन वर्षासाठीच्या कामाची रुपरेषा मनोगत व्यक्त करताना विशद केली. त्यानंतर कार्यकारिणीतील नवीन सदस्यांचे अभिनंदन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here