सिंधुदुर्ग : उद्धव ठाकरे यांनी मंत्रीपद देण्यासाठी कोट्यावधी रुपये माझ्याकडे मागण्यात आले होते. परंतु मी “कमिटमेंट” पूर्ण करण्यासाठी कमी पडलो. त्यामुळे मला डावलण्यात आली तरीही तब्बल एक कोटी रुपये मी त्यांना चेकच्या माध्यमातून दिले तशा प्रकारचे माझ्याकडे पुरावे आहेत, असा आरोप आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केला. दरम्यान तब्बल दोन महिने मी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानाबाहेर वाट बघत होतो. परंतु मला भेट देण्यात आली नाही. कॅबिनेट मंत्री पदासाठी माझे नाव चर्चेत असताना मला राज्यमंत्रीपद देण्यात आले. तरी मी गप्प राहिलो. मग मी गद्दार कसा? मला गद्दार म्हणण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? असा सवाल केसरकर यांनी केलाय.
या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत केसरकर यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे २ दिवसापूर्वीच सिंधुदुर्ग जिल्ह्यात आले होते . त्यावेळी त्यांनी सावंतवाडीतील जनसंवाद यात्रेतून मंत्री दीपक केसरकर यांच्यावर टिका केली होती. त्या टिकेला मंत्री केसरकर यांनी सावंतवाडीत येऊन प्रत्युत्तर दिले. माझ्या श्रध्देवर संशय घेणाऱ्या उध्दव ठाकरे यांनी मी शिर्डीहून आणलेली साईबाबांची शाल ठाकरे यांना घातल्यानंतर ते मुख्यमंत्री झाले. याची कबुली रश्मी ठाकरे यांनी दिली आहे. मग आता सावंतवाडीत येऊन खोटे कशाला बोलायचे? असा सवाल मंत्री केसरकर यांनी केला आहे. मला गद्दार म्हणण्याचा अधिकार ठाकरे यांना नाही. त्याचे कर्तृत्व काय? मुख्यमंत्री असताना लोकांना सोडा आमदारांनाही भेटत नव्हते. मी तब्बल २ महिने मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानाच्या बाहेर वाट बघत होतो. पण मला कधी भेट मिळत नव्हती. मग यांच्याकडे लोक थांबणार कसे? असा सवाल करत मी स्वतःहून शिवसेनेत गेलो नव्हतो. मला भाजपकडून निमंत्रण असतना उध्दव ठाकरे यांनी सतत निमंत्रण दिले म्हणून शिवसेनेत गेलो, असे मंत्री केसरकर यांनी सांगितले.
नितेश राणेंनी केसरकर यांच्या विधानाचं समर्थन केलंय.
दीपक केसरकर यांनी केलेल्या विधानाशी समर्थन करतो.उद्धव ठाकरे पदांसाठी पैसे घेतात.असा आरोप 2004 साली नारायण राणे रंगशारदा येथे पहिल्यांदा केला होता. रंगशारदामध्ये शिवसेनेची त्यावेळी बैठक झाली होती. विधानसभा ,लोकसभा, जिल्हा अध्यक्ष, उद्धव ठाकरे कसे घेतात त्याचं रेट कार्ड जाहीर करून टाकलं होतं.त्याचप्रमाणे केसरकर देखील म्हणतायत की,मी वाईट चेक दिला होता.आणि अकाऊंटमध्ये चेक गेलाय.उद्धव ठाकरे विधान सभा ,लोकसभेसाठी पैसे घेतात हे शिका शिक्कामोर्तब झालेला आहे.
वैभव नाईक म्हणाले,राष्ट्वादीतून बाहेर पडल्यानंतर दिपक केसरकर यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय.त्यानंतर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मेहनत घेत निवडून आणून विधानसभेवर पाठविण्यात आले.राष्ट्रवादीचे उमेदवार असतील तर त्याना आम्ही निवडून देणार नाही त्यामुळे केसरकर यांनी शिवसनेत प्रवेश केला.नारायण राणे यांनी दीपक केसरकर यांना जिल्हा नियोजन मधून बाहेर ठेवलं होतं.त्यामुळे शिवसेनेतुन केसरकराना निवडून आणण्याचं निश्चित केल होत.आणि त्यावेळी केसरकराना कुठला तरी आधार पाहिजे होता म्हणून त्यावेळी शिवसेनेने आधार दिला.त्यामुळेच दीपक केसरकर हे आमदार, मंत्री होऊ शकले.मंत्री असताना केसरकरांनी किती जणांना खोके दिले.निवडणुकीच्या वेळी माझ्याकडे पैसे नाही मी जमीन विकतोय अस टाव फोडून सांगतायत.नारायण राणे, शरद पवार, अशा नेत्यांवर टीका करायची आणि संधी साधून घायचे.दीपक केसरकर यांच्या सोबत सावंतवाडी मतदारसंघातील जनता नाही.त्यामुळे केसरकर यांची पायाखालीची वाळू सरखली आहे.