30 C
Panjim
Sunday, April 2, 2023

अटकसत्र सुरु, कनेडी राड्यात शिवसेना भाजपाचे १० कार्यकर्ते ताब्यात* *अटक करतील तेव्हा करून घेणार – आमदार वैभव नाईक

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

 

सरकारी कामात अडथळा, जीवे मारण्याचा प्रयत्न या गुन्ह्यात अटक

सिंधुदुर्ग : कनेडी राडा प्रकरणी पोलिसांकडून आपल्याला कोणतीही नोटीस बजावली गेलेली नाही मात्र अटक करतील तेव्हा अटक करून घेईन असे शिवसेना ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी मटा ऑनलाइनशी बोलताना सांगितले आहे. दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही गटाच्या १० जणांना अटक केली आहे.

कणकवली कनेडी येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्त्यांनी भाजपा कार्यालयात जात मारहाण,त्यानंतर भाजपा कार्यकर्त्यांनी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या कार्यालयातील कार्यकर्त्यांना मारहाण केली.तसेच या कालावधीत कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस काम करत असताना धक्काबुक्की करत अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हे २४ जानेवारीला दाखल करण्यात आले होते.या राडा प्रकरणातील तीन गुन्ह्यात दोन्ही पक्षाच्या १० कार्यकर्त्यांना कणकवली पोलिसांनी मध्यरात्री २ वाजता ताब्यात घेतले होते.

मध्यरात्री पोलीस निरीक्षक अनिल जाधव यांच्या नेतत्वाखालील अटकेची कारवाई करण्यात आली. या आरोपींवर भादवी कलम ३०७, ३५३ यासह अन्य गुन्हे असून गंभीर दुखापत करत जीवे मारण्याचा प्रयत्न,सरकारी कामात अडथळा या गुन्ह्यात १३ दिवसानंतर अटक करण्यात आली आहे.

*हि आहेत कार्यकर्त्यांची नावे*

त्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मंगेश रामचंद्र सावंत (वय ४८,भिरंवडे ), कृणाल विजय सावंत(वय -३४, रा.सांगवे), योगेश रमाकांत वाळके (वय ४२, रा.कनेडी), श्रीकांत नारायण सावंत(वय ५०,भिरंवडे),राजेश मधुकर पवार (वय ५१,दिगवळे) या पाच आरोपींना कणकवली पोलिसांनी अटक केली आहे.

तर भारतीय जनता पार्टीच्या निखिल प्रकाश आचरेकर(वय ३९, रा. मारुती आळी,कणकवली), अनिल राजाराम पांगम (वय ५८,सांगवे),संतोष वसंत आग्रे ( वय ४९, फोडांघाट) ,संदीप बाळकृष्ण गावकर (वय ३२, सांगवे), तुषार श्यामसुंदर गावकर (वय २९,सांगवे) या पाच जणांना कणकवली पोलिसांनी अटक केली आहे.

भाजपा विरुद्ध ठाकरे शिवसनेच्या कनेडी येथील राड्यात आयपीसी ३०७ मधील दोन्ही गुन्ह्यातील एकूण ६ तर आयपीसी ३५३ मधील ४ आरोपींना कणकवली पोलिसांनी आज मध्यरात्री अडीच वाजता अटक केली आहे. यामध्ये आयपीसी ३०७ मधील गुन्ह्यात दोन्ही गटातील कुणाल सावंत, योगेश वाळके, मंगेश सावंत, श्रीकांत सावंत, राजेश पवार, निखिल आचरेकर या ६ जणांना तर आयपीसी ३५३ मधील अनिल पांगम, संतोष आग्रे, संदीप गावकर, तुषार गावकर याना अटक केली आहे. पोलीस निरीक्षक अनिल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय सागर खंडागळे, पीएसआय वृषाली बर्गे यांनी ही कारवाई केली

*आमदार वैभव नाईक यांच्यावर अटकेची टांगती तलवार*

या प्रकरणी ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांच्यावरही अटकेची टांगती तलवार आहे. आमदार नाईक यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. एक दांडा हातात घेऊन आमदार वैभव नाईक हे भाजपा कार्यकर्त्यांच्या दिशेने जात असल्याचे यामध्ये दिसून येत आहे. यावेळी अतिरिक्त पोलीस कुमक मागून हा राडा कणकवली पोलिसांनी शांत केला होता.

*आपल्याला नोटीस नाही मात्र अटक करतील तेव्हा होऊन घेणार*

दरम्यान या प्रकरणी पोलिसांकडून आपल्याला कोणतीही नोटीस बजावली गेलेली नाही. अशी माहिती आमदार वैभव नाईक यांच्याशी संपर्क साधल्यानंतर त्यांनी दिली आहे. आपल्याला पोलीस अटक करतील तेव्हा अटक करून घेणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. दरम्यान आता आपण कामानिमित्त बाहेर असून पोलिसांना पूर्ण सहकार्य करणार असल्याचे ते म्हणालेत.

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

Latest On Our Channel

YouTube player

Latest On Hub Encounter

YouTube player

Latest on Passay

YouTube player

Latest on Unsung hero

YouTube player
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles