ही निवडणूक आर.जी विरुद्ध बीजेपी :- मनोज परब

0
150

काँग्रेसवाले बीजेपी वाल्याना फितूर, मनोज परब यांचा काँग्रेसवर घणाघाती आरोप

सध्या लोकसभा निवडणूक अंतिम टप्प्यावर येवून पोहोचली आहे. यादरम्यान पक्षांचे एकमेकावर आरोप प्रत्यारोप सुरूच आहे. काल मंगळवारी रेव्होलुशनरी गोवन्स तर्फे पत्रकार परिषद घेण्यात आली असून, यावेळी आर.जी. चे अध्यक्ष तसेच उत्तर गोवा लोकसभा उमेदवार मनोज परब यांनी काँग्रेसचे दोन्ही उमेदवारावर घणाघाती आरोप करत, त्यांचा पर्दाफाश केला आहे.

काँग्रेस पक्षाच्या वतीने उभा करण्यात आलेले रमाकांत खलप यांच्यावर भाऊसाहेब बांदोडकर यांनी विश्वास ठेवून त्यांना बहुजन समजावसाठी झटणाऱ्या तेव्हाच्या मगो पक्षाची धुरा सांभाळण्यासाठी दिली. परंतु आपल्या राजकीय स्वार्थासाठी त्यांनी तो पक्ष सोडून१९९९ मध्ये काँग्रेस पक्षात प्रवेश केला. ते तिथेच न थांबता परत २००० साली बीजेपी मध्ये पक्षांतर केले. २००३ साली परत काँग्रस्मध्ये घरवापासी केली. अशा ह्या पक्ष बदलू उमेदवारावर जनतेने विश्वास तरी कसा ठेवावा असा सवाल मनोज परब यांनी यावेळी उपस्थित केला. गोव्याचे पाहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर यांनी हे रमाकांत खलप बहुजन समाजासाठी काहीतरी करणार, त्यांच्यासाठी झटणाऱ ह्या उद्देशाने मोठा विश्वास ठेवला, परंतु खलप यांनी आपल्या राजकीय स्वार्थासाठी, बहुजन समाजाच्या पक्षाची तत्वे आणि विचार गहाण ठेवून स्वतःचा स्वार्थ साधला असल्याचेही मनोज परब म्हणाले.

काँग्रेस पक्षाच्या दक्षिण गोवा लोकसभा उमेदवार विरीअटो फर्नांडिस यांच्यावरही मनोज परब यांनी आरोप केले असून, बीजेपी पक्षाने सर्व सर्व्हे केल्यानंतरच बीजेपी पक्षाच्या सांगण्यानेच त्यांना उमेदवारी काँग्रेस पक्षाने दिली असून, विरीअटो फर्नांडिस यांनी गोयचो आवाज ह्या संघटनेच्या माध्यमातून लोकांसमोर आले होते. २०१८ साली विरीअटो फर्नांडिस यांच्याबरोबर आम्ही अन्यायाविरुद्ध आवाज उठवत होतो, सर्व पक्षांचा पर्दाफाश करत होतो. परंतु आज हेच विरीअटो फर्नांडिस काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर निवडणूक कसे काय लढत आहेत, ह्या प्रश्नाचे उत्तर त्यांनी जनतेला द्यावे. आज त्यांनी सुद्धा स्वताच्या राजकीय स्वार्थासाठी गोयचो आवाज, ज्या संघटनेचा मूळ उद्देश हा अन्यायाविरुद्ध लढा देण्याचा होता, एक पक्ष म्हणून पुढे नेण्याचा विचार होता, आज त्याच संघटनेला ह्या विरीअटो फर्नांडिस यांनी रस्त्यावर फेकून दिले आहे. आपल्या वैयक्तिक फायद्यासाठी, गोयचो आवाज ज्या संघटनेला अनेक लोकांनी आपला पाठिंबा दर्शविला होता आज त्यांच्याशी गद्दारी करून, बीजेपीची बी टीम असलेल्या काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढत आहेत. गोव्यातील जनतेने हा सर्व राजकीय खेळ गांभीर्याने लक्ष ठेवून समजून घेण्याची गरज असून, हे दोन्ही पक्ष एकमेकांना फितूर असल्याचेही मनोज परब यांनी या पत्रजासर परिषदेतून म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here