कोकण – कल्याण वेस्ट येथील एका इन्व्हेसमेंट कंपनीत अज्ञात महिलेल्या बतावणीवरून स्किममध्ये पैसे गुंतवणाऱ्या तरूणाला सुमारे 11 लाख रूपयांचा गंडा घालण्यात आला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच या तरूणाने रत्नागिरी शहर पोलिसांत फिर्याद दाखल केल़ी त्यानुसार पोलिसांनी अज्ञात महिलेविरूद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
ही घटना 20 जानेवारी ते 6 जून 2022 या कालाधीत घडल़ी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी साई ऍडव्हसरी ऍण्ड इन्व्हेसमेंटस ऑफिस श्री गणेश माधव सनसार खडकपाडा, कल्याण वेस्ट या कंपनीत वेळोवेळी कंपनीतील अल्गो ऑप्शन स्टारटेजी मॉडेल अर्न या गुंतवणुकीच्या स्कीममध्ये 20 जानेवारी ते 7 जून 2022 या कालावधीत वारंवार 11 लाख रुपयांचा भरणा केला. मात्र या व्यवहाराबाबत फिर्यांदीना कोणताही एम.ओ.यु. करुन न देता अथवा फिर्यादी यांच्या रक्कमेच्या परताव्याची खात्री म्हणून धनादेशही दिला नाही.वारंवार गुंतवणूक केलेल्या रक्कमेबाबत पाठपुरावा करु लागल्यावर कंपनीकडून कोणत्याही प्रकारची हमी मिळत नसून संशयित महिलेने फिर्यादीकडून स्वीकारलेली रक्कम परत करण्यास टाळाटाळ केली.
संशयित महिला आपली फसवणूक करत असल्याच्या लक्षात येताच तकारदार यांनी शहर पोलीस ठाणे गाठले. संशयित महिलेच्या या कृत्यामुळे फिर्यादी यांच्या कुटुंबाला अतोनात शारीरिक व मानसिक त्रास होत असून फार मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.संशयित महिला या फिर्यादी यांनी दिलेले पैसे परत करतील, असा विश्वास ठेवून होते.मात्र आजपर्यंत त्यांनी फिर्यादी यांच्याशी कोणताही संपर्क केलेला नाही.त्यामुळे फिर्यादी यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयित महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.अधिक तपास शहर पोलीस अमंलदार करत आहेत.