सिंधुदुर्ग – जिल्ह्यातील आयुर्वेद संशोधन केंद्राला दोडामार्गात तालुक्यातील आडाळी येथे जागा देण्याचे सोडुन लातुरला पळवण्याचा घाट सत्ताधारी लोकांनी घातला आहे. केंद्रातील मोदी सरकारने या संशोधन केंद्राला मंजुरी दिली होती. मात्र आघाडी सरकारचे वैद्यकीय मंत्री अमित देशमुख यांनी नसता उद्योग सुरु केला आहे.
अशावेळी जिल्ह्यातील सत्ताधारी मात्र झोपलेल्या अवस्थेतआहेत असा घणाघाती आरोप माजी आमदार प्रमोद जठार यांनी केला आहे. ते कणकवली येथे बोलत होते.
आडाळी एमआयडीसी येथे शंभर एकर जागेमध्ये केंद्रीय आयुर्वेद वनस्पती संशोधन केंद्र (NIMP) करण्याबाबत केंद्र सरकारचे आयुष्य मंत्री श्रीपादभाई नाईक यांनी मंजुरी दिलेली आहे. मात्र राज्य सरकार कडून ही जागा हस्तांतरण होण्याची गरज असताना ती प्रक्रिया करण्यास राज्य सरकारचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी मंजुरी द्यायचे सोडुन सदर केंद्राला लातुर येथे जागा देतो , असा प्रस्थाव केंद्रसरकारला पाठवला असल्याचा दावा प्रमोद जठार यांनी केला आहे.