सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोविड आरोग्य विभागात नर्सच्या पगारात घोळ, नर्सेसनी मांडली आमदार नितेश राणेंकडे दाद

0
188

सिंधुदुर्ग – जिल्ह्यात आरोग्य सेवा देणाऱ्या प्रत्येक नर्सच्या पगारातील प्रतिमहिना १० हजार रुपयांवर डल्ला मारला जात आहे. कोल्हापूर, रत्नागिरी मध्ये नर्सना ३० हजार पगार दिला जातो तेथे सिंधुदुर्ग जिल्ह्यात या कोविड केअर सेंटर्स मध्ये काम करणाऱ्या नर्सना २० हजार पगार दिला जात आहे.

येथे ठेकेदार नाहीत तर जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या कार्यल्यातून थेट पगार दिला जातो. त्यामुळे प्रशासनात लाखोंचा भ्रष्टाचार होतो असा थेट आरोप जिल्ह्यात काम करणाऱ्या नर्सने केला आहे.

या संदर्भात आमदार नितेश राणे यांची कणकवली येथे भेट घेऊन त्यांनी आपली कैफियत मांडली आहे. कोरोना काळात तात्पुरत्या स्वरूपात सेवेसाठी घेतलेल्या नर्सच्या पगारावर डल्ला मारण्याचा प्रकार म्हणजे निःस्वार्थ सेवा देणाऱ्या नर्सना ठकविण्याचा प्रकार उघड झाला आहे.

कार्यालयीन बाबूंकडून हे प्रकार होणे म्हणजे आरोग्य विभागात चाललेल्या भ्रष्ट्राचाराचा कळस म्हणावा लागेल. दरम्यान नर्स कोरोना काळात सीसीसी सेंटर आणि तालुकानिहाय काम करण्यासाठी नियुक्त केलेल्या त्यांना ११ महिन्याची कामगिरी देण्याचा नियम असतांना २ किंवा ३ महिन्याची कामगिरी दिली जाते.

तीन महिने कामावर दाखवून उर्वरित महिन्याचा पगार काढला जात असावा असा संशय सुद्धा या नर्सनी व्यक्त केला आहे. दरम्यान या संदर्भात आमदार नितेश राणे यांनी जिल्हा शल्यचिकित्सक यांना जाब विचारणार असल्याचे आश्वासन दिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here