सिंधुदुर्ग – जिल्ह्यात आज आणखीन तीन रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत. अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकोरकर यांनी दिली आहे.देवगड मध्ये सापडलेल्या कोरोना बाधीत महिलेच्या संपर्कातील दोन जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यात एक 21वर्षीय तरुण तर एक 24 वर्षीय तरुणी आहे. तर तिसरा रुग्ण नेरूर येथील असून ती 24 वर्षीय तरुणी आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत 8 रुग्ण पॉझिटिव्ह सापडले असून त्यातील दोघे जण कोरोनामुक्त होऊन घरी गेलेत, तर दोघांचा फेरतपासणी चाचणी अहवाल कालच निगेटिव्ह आला होता. जिल्ह्यात चाकरमान्यांचा ओघ वाढत असून रुग्ण संख्या वाढण्याची दाट शक्यता आहे.



