सिंधुदुर्ग – जिल्हयात अनेक भली माणसे जन्माला आली. या माणसांनी विविध क्षेत्रातून जिल्ह्याचे नाव देशाच्या कानाकोपऱ्यात अजरामर केले कणकवली तालुक्यातील नरडवे गावचे सुपुत्र सदाशिव गंगाराम बाईत यांनी एक सैनिक म्हणून देशाची सेवा करताना देशासाठी बलिदान दिले आहे. 1971 च्या भारत पाकिस्तान युद्धात सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कणकवली तालुक्यातला हा वीरपुत्र शहीद झाला. आज त्यांच्या हौतात्म्याला 50 वर्ष पूर्ण होत आहेत.
सदाशिव बाईत हे नरडवे (भैरवगाव) तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग चे सुपुत्र. वयाच्या बाविसाव्या वर्षी देशाची सेवा करण्यासाठी सैन्यात भरती झाले. मराठा लाईट इन्फंट्री बेळगाव येथून सैन्यात भरती झाले. देश सेवा करत असताना त्यांनी सैन्य सेवा मेडल, पूर्वी स्टार मेडल, संग्राम मेडल देऊन गौरविण्यात आले होते. भारत पाकिस्तान विरुद्ध 1971 साली झालेल्या युद्धात शत्रूशी दोन हात करताना मृत्युमुखी पडलेले वीर जवान सदाशिव गंगाराम बाईत यांच्या हौतात्म्याला दिनांक 21 /12 /2021 रोजी पन्नास वर्षे पूर्ण होत आहेत. त्यांच्या शौर्याचा देशातर्फे मरणोत्तर बॅज ऑफ सॅक्रिफाइस(Badge of Sacrifice) हे शौर्य पदक देऊन गौरव करण्यात आला अशा या महान वीर जवानास आमचा कोटी कोटी प्रणाम!. आपले कार्य आमच्यासाठी व देशासाठी आदर्श आहे. त्यांच्या पश्चात पत्नी,मुलगा, सून व त्यांची 2 नातवंडे व इतर कुटुंबीय आहेत.त्यांच्या जन्मगावी किंवा तालुक्याच्या ठिकाणी त्यांचे स्मारक व्हावे किंवा एखाद्या सार्वजनिक ठिकाणाचे नामकरण व्हावे अशी कुटुंबीयांची इच्छा आहे.