सिंधुदुर्गात प्राथमिक शिक्षणाधिकारी यांच्या विरोधात जिल्हाभरातील शिक्षक एकवटले जिल्हा परिषद समोर केले लक्षवेधी आंदोलन

0
259

 

सिंधुदुर्ग – जिल्ह्यात प्राथमिक शिक्षणाधिकारी यांच्या विरोधात जिल्हाभरातील शिक्षक एकवटले होते. आज जिल्हा परिषद समोर लक्षवेधी आंदोलन करीत शिक्षणाधिकाऱ्यांचा या शिक्षकांनी निषेध केला.

शिक्षणाधिकाऱ्यांच्या एकाधिकारशाहीविरोधात केले आंदोलन

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोवकर यांच्या एकाधिकारशाही विरोधात जिल्हाभरातील प्राथमिक शिक्षक आज एकवटले आणि जिल्हा परिषद प्रवेश दारासमोर लक्षवेधी आंदोलन करून प्राथमिक शिक्षणाधिकारी यांच्या कार्यपद्धतीचा तीव्र शब्दात निषेध करत त्यांच्यावर हल्लाबोल चढविला.

गेले काही दिवस सुरू आहे शिक्षकांचा उठाव

गेले काही दिवस प्राथमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोवकर यांच्या कार्यपद्धती विरोधात जिल्हाभरातील प्राथमिक प्राथमिक शिक्षकांनी आवाज उठविला होता. 50% शिक्षक उपस्थिती सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापन व कला क्रीडा स्पर्धा बाबतचे प्राथमिक शिक्षणाधिकारी यांनी दिलेले आदेश तात्काळ रद्द करण्याची मागणी शिक्षकांनी केली होती. मात्र या शिक्षकांच्या मागणीकडे प्राथमिक शिक्षणाधिकारी यांनी दुर्लक्ष करीत शिक्षकांना डिवचण्याचा प्रयत्न केला. उलट माझ्या आदेशावर मी ठाम आहे असे प्रति आव्हान दिले. त्यामुळे शिक्षक संतापले आणि आज जिल्हा परिषदेसमोर या एकाधिकारशाही विरोधात लक्षवेधी आंदोलन करीत तीव्र शब्दात संताप व्यक्त केला.

आमचे आंदोलन प्रशासनाविरोधात नाही

आमचे आंदोलन जिल्हा परिषद प्रशासनाविरोधात नाही. पदाधिकाऱ्यांच्या विरोधात नाही. तर एकाधिकारशाही करणाऱ्या शिक्षण अधिकाऱ्यांच्या विरोधात आहे. असे ठाम प्रतिपादन नितीन कदम यांनी या वेळी केले. आज सकाळपासून जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून सर्व शिक्षक जिल्हा मुख्यालयावर धडकले. कोरोनाच्या च्या पार्श्वभूमीवर त्यांची प्रत्येक प्रवेशद्वारावर थर्मल गण ने तपासणी करण्यात आली. त्यानंतर त्यांना आंदोलन स्थळी पाठविण्यात आले. यावेळी अभूतपूर्व पोलिस बंदोबस्तही लावण्यात आला होता. सर्व शिक्षक संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावर एकवटले आणि प्राथमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोवकर यांच्या कार्यपद्धती विरोधात घोषणाबाजी केली त्यामुळे मुख्यालय परिसर दणाणून गेला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here