सिंधुदुर्गात दगड खाणीमधे उत्खनन करताना सुरूंग स्फोटामुळे निगूडे गावातील 157 घरांना तडे प्रशासनाकडूनही होतो दुर्लक्ष

0
261

 

सिंधुदुर्ग – जिल्ह्यातील सावंतवाडी, वेत्ये, आणि इन्सूली गावात काळ्या दगड खाणीचे मोठ्या प्रमाणात उत्खनन सुरू आहे. खाणीमध्ये मोठ मोठे सुरूगं स्फोट केल्यामुळे बाजूलाच असलेल्या निगुडे गावातील घरांना तडे गेल्याने ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. येथील 157 घंराना मोठ मोठ्या भेगा गेल्या आहेत.

नुकसान भरपाई पासून ग्रामस्थ अजूनही वंचित

गावातील मंदीरे, ग्रामपंचायत इमारतीलाही तडे गेले आहेत. येथील ग्रामस्थानी अनेक वेळा उपोषणे करून देखील प्रशासनाचा दुर्लक्ष होत आहे. एक वर्षापुर्वी सावंतवाडी तहसीलदारांनी घराची पाहणी करून 20 लाख 35 हजार रूपये नुकसान झाल्याचा अहवाल देऊन संबंधित कंपन्याना नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले. मात्र एक वर्ष होऊनही अद्याप येथील ग्रामस्थाना नुकसानीचे पैसे मिळाले नाहीत.

प्रशासनाचा होतोय कानाडोळा

प्रशासन याकडे का कानाडोळा करत आहे असा प्रश्न ग्रामस्थानी उपस्थित केला आहे.
कष्टाने उभ्या केलेल्या घरांना डोळ्या देखत सुरूंग स्फोटामुळे भेगा पडत आहेत. माञ उपोषणे, आंदोलने करून देखील प्रशासन लक्ष देत नाही मग न्याय मागावा तर कोणाकडे? भेगा गेलेल्या घरात राहायचे तरी कसे असा प्रश्न ग्रामस्थांन पडला आहे.

आम्हाला इथे रहायला भीती वाटते

येथील स्थानिक रहिवाशी सविता नारायण गावडे म्हणाल्या की ज्यावेळी येथील खाणीत स्फोट होतो तेव्हा भूकंप झाल्यासारखी अवस्था होते. आम्हाला इथे रहायला भीती वाटते. घराला संपुर्ण भेगा गेल्या आहेत. घर कोसळेल याचीही भीती वाटते असे त्यांनी सांगितले.

तीन वर्षात तीन उपोषण केली

समिल गावडे हे येथील सरपंच आहेत. ते सांगतात या खाणीत सातत्याने अवैध उत्खनन होत आहे. याबाबत आम्ही गेल्या 3 वर्षात 3 उपोषण केली मात्र याची दखल घेतली जात नाही. आमच्या उपसरपंच यांचे मातीचे घरही यामुळे कोसळले आहे असे त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here