सिंधुदुर्गात कणकवली नगराध्यक्षासह चौघांवर गुन्हे

0
220

 

`लॉकडाऊन’ असतानाही विनाकारण रस्त्यावर फिरताना आढळलेल्या भाजप कार्यकर्ता जावेद शेखला पोलिसांनी विचारणा केली असता जावेद शेख याने पोलिसांशी हुज्जत घातली. यामुळे जावेद याला पोलिसांनी ताब्यात घेतले. सदर बातमी कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे, नगरसेवक अबिद नाईक, संदीप नलावडे यांना समजताच त्यांनी पोलीस स्थानकात येऊन पोलिसांशी वाद घातला. याप्रकरणी या चारही जणांविरोधात कणकवली पोलीस स्थानकात शासकीय कामात अडथळा आणला व अन्य आरोपानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना गुरुवारी सायंकाळी घडल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असतानाही जावेद शेख हा युवक येथील पटकीदेवी परिसरात सातत्याने फिरत होता. याबाबत तेथे ड्युटीवर असणारे पोलीस नाईक आशिष जमादार यांनी विचारणा केली असता जावेद याने त्यांच्यासमवेत वादावादी केली. त्यामुळे जमादार यांनी अन्य पोलिसांसह जावेद याला पोलीस स्टेशनला नेले. या घटनेची माहिती मिळताच नगराध्यक्ष समीर नलावडे व काहींनी पोलीस स्थानकात धाव घेतली. यात पोलीस व राजकीय मंडळी यांच्यात जोरदार वादावादी झाली. अखेर या प्रकरणी वरील चौघांविरोधात भा. दं. वि. कलम 353, 332, 186, 188, 504, 506, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम कलमानुसार गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती कणकवली पोलिसांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here