सिंधुदुर्ग – मुंबई-गोवा महामार्गावर ओसरगाव येथे तवेरा कार पलटी होऊन झालेल्या अपघातात एक तरुण ठार झाला तर तीन प्रवासी जखमी झाले आहेत.मंगळवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास हा अपघात घडला.तवेरा कार मधील आठ प्रवासी गोव्याहून कोल्हापूरला जात होते.
गोवा येथिल पर्यटन आटोपून कोल्हापूर येथील हे आठही जण मुंबई – गोवा महामार्गावरून कोल्हापूरच्या दिशेने जात होते.पहाटे साडेपाचच्या सुमारास ओसरगाव तलावाजवळ भरधाव असलेली हि तवेरा कार क्रमांक एम.एच.११ बी. झेड. ९०७५ येथील रस्त्यालगतच्या डिवायडरला धडकली.या भीषण अपघातात कारमधील सुकुमार देवप्पा चौगुले ( वय २९ ,राहणार शाहू मार्केट यार्ड ,कोल्हापूर ) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला.त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती.
या कारमध्ये असलेले आणखी तिघेजण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी कणकवली येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.देवदत्त कुंभार (वय २९),अभिजित देशमुख अशी जखमींची नावे आहेत.