सिंधुदुर्ग – जिल्ह्यात प्रथमच सुरु होत असलेल्या खाजगी हिताची एटीएम चे उद्घाटन आज रात्रीस खेळ चाले सिरीयल फेम अण्णा नाईक म्हणजेच श्री.माधव अभ्यंकर यांच्या हस्ते तसेच प्रसिद्ध उद्योगपती श्री बापू नाईक व सौ प्रमिला नाईक, सौ रेखा अभ्यंकर, यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले . हे एटीएम सेंटर हॉटेल आरएसएन, मुंबई गोवा महामार्ग कुडाळ येथे सुरू झाले आहे.
या एटीएम मशीनमधून सर्व बॅंकांच्या एटीएम कार्ड द्वारे पैसे काढता येणार आहेत तर काही बॅंकांच्या खात्यामध्ये पैसेही भरता येणार आहेत.. प्रशस्त पार्कींग ही आणखी एक जमेची बाजू या एटीएम सेंटरची आहे. या एटीएम सेंटरच्या उद्घाटन प्रसंगी डॉ अनिल नेरुरकर माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित देसाई सीए सुनील सौदागर, नायब तहसिलदार उदय दाभोलकर, कांचन भाताडे, राजा गवस, द्रारकानाथ घुर्ये, राजन नाईक, प्रसाद खानोलकर, सौ नयना नाईक, प्रसाद नाईक, श्वेता नाईक, ऍड अश्विनी नाईक, प्रसाद पडते, केदार सामंत, नंदन वेंगुर्लेकर, विकास गावकर आदी मान्यवर उपस्थित होते. चांगली सर्वीस मिळावी या हेतूने एटीएम सेंटरचे खाजगीकरण महत्वपुर्ण मानले जात असून हे हिताची एटीएम सेंटर हॉटेल आरएसएन चे मालक राजन नाईक व शासकीय ठेकेदार प्रसाद खानोलकर यांच्यातर्फे चालविण्यात येणार आहे.